(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्य परिवहन महामंडळात कॉलसेंटर कार्यान्वित 1800221250 वर संपर्क करा | मराठी १ नंबर बातम्या
" />

राज्य परिवहन महामंडळात कॉलसेंटर कार्यान्वित 1800221250 वर संपर्क करा

मुंबई ( १६ नोव्हेंबर ) : एसटी महामंडळात रात्रंदिवस चालू असणाऱ्या कॉलसेंटरचे उद्घाटन परिवहन मंत्री तथा म.रा.मा.प. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली व लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहीया व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 1800221250 असा हा या कॉल सेंटरचा संपर्क क्रमांक आहे.

हे कॉल सेंटर 24x7 रात्रंदिवस सुरु राहणार असून प्रवाशांना सर्व माहिती एकाच नंबरवर मिळू शकेल. कॉल सेंटरमध्ये अत्याधुनिक प्रणालीद्वारे महामंडळाच्या हेल्पलाईन नंबरवर येणाऱ्या कॉलचे उत्तर देण्यात येईल. यासाठी प्रवाशी संबधित या प्रणालीद्वारे प्रवाशी चौकशी, तक्रारी व सूचना बाबत कार्यवाही करण्यात येईल, असे रावते यांनी यावेळी सांगितले.

रायकर म्हणाले, रा. प. महामंडळास कॉल सेंटर अत्यंत गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांना तत्परतेने आवश्यक ती माहिती मिळेल. तसेच प्रवाशांना आपल्या तक्रारी व सूचना सुलभतेने मांडता येतील. प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या महामंडळाने ही एक चांगली सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही रायकर यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget