(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देण्‍यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांचा पालिका आयुक्‍तांनी घेतला आढावा | मराठी १ नंबर बातम्या
" />

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देण्‍यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांचा पालिका आयुक्‍तांनी घेतला आढावा

मुंबई ( १० नोव्हेंबर ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ६ डिसेंबर, २०१७ रोजी असणाऱया ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात वाढ केली असून दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात येणाऱया विविध सेवा-सुविधांबाबत प्रशासन सतर्क व सुसज्ज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले.

महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १० नोव्हेंबर, २०१७) महापालिका मुख्यालयात महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, एमएमआरडीए, पोलिस प्रशासन, बेस्ट, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या पदाधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी मेहता आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए. एल. जऱहाड, उप आयुक्त (परिमंडळ - २) नरेंद्र बर्डे, उप आयुक्‍त (महापालिका आयुक्‍त) रमेश पवार, उप आयुक्‍त (आरोग्‍य सेवा) सुनिल धामणे, संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे,उपाध्‍यक्ष महेंद्र साळवे, उपाध्‍यक्ष रवी गरुड, भंन्‍ते करुणानंद थेरो, साधनानंद थेरो व राहुल बोधी महाथेरो, व इतर संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्यभूमी येथे येणाऱया अनुयायांकरीता पुरविण्यात येणाऱया नागरी सेवा-सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिका मागील सतरा वर्षांपासून ज्याप्रकारे उत्तमोत्तम सेवा पुरवित आहे, त्याचप्रमाणे यावर्षीही त्‍यामध्‍ये आढावा घेऊन वाढ करुन उत्तम सेवा-सुविधा पुरविणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. विविध संबंधित संस्थांचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला दिलेल्या सुचनांची पडताळणी करुन त्या अंमलात आणण्यासाठी त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मेहता यावेळी म्हणाले. शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळया ठिकाणी फिरती शौचालये, रांगेत उभे असणाऱया अनुयायांसाठी फिरती शौचालये, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱया अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाकडे याही सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनातर्फे तयारी सुरु आहे.

महापालिका आयुक्‍त मेहता यांनी यावेळी सांगितले की, डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेण्‍यासाठी येणारा अनुयायी शिस्‍तबद्ध असतो. तेव्‍हा प्रत्‍येक ५० मीटर अंतरावर कचराकुंडी ठेवण्‍यात यावी. स्वच्छतेच्या अनुषंगाने सुमारे १५३५ कर्मचाऱयांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहतील. कर्मचाऱयांवर ताण पडू नये यांसाठी सफाई कर्मचाऱयांची कामाची वेळ आठ तासांवरुन सहा तास करण्यात आली आहे. समुद्रकिनारी बोटी तैनात ठेवणे, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासोबत राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय याठिकाणीही आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही मेहता यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था, वंदनीय भंन्‍तेजी यांच्यासाठी भारत स्‍काऊटचे गाईड येथे निवासाची व्यवस्था, शिवाजी पार्क, दादर स्थानक, चैत्यभूमी परिसरात ७ माहिती कक्ष / निरीक्षण मनोरे, ११ रुग्णवाहिकेसहीत सुसज्ज आरोग्य सेवा, अनुयायांसाठी ६० क्लोज सर्कीट टीव्‍ही, फिरते कॅमेरे, दूरचित्रवाहिनी, ४४ मेटल डिटेक्टर, ८ बॅग स्कॅनर्स, ६० हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर, विद्युत व्यवस्था (३५० टयुबलाईटस्, २३० हॅलोजन, ५० पेडेस्टंट फॅन), १०० डिलक्स व ३५० प्लास्टीक खुर्च्या, ३०० लाकडी मेज (टेबल), ध्वनिक्षेपण व्यवस्था, ३०० चार्जिंग पॉईंटस्, २६० फिरती शौचालये, २६० स्नानगृह, २ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी व जलसुरक्षा, शिवाजी पार्क येथे ४६९ स्टॉल्सची रचना, पिण्याच्या पाण्याच्या ३२० नळांची व्यवस्था, १५ टँकर्स, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग्ज व दिशादर्शक फलक, १४ हजार चौ.मी. वर धूळप्रतिबंधक आच्छादक, २६० न्हाणीघरांमध्ये शॉवरची व्यवस्था, बसण्यासाठी ५० बाकडे या सुविधांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी येणाऱया अनुयायांसाठी वैद्यकीय मदत व सहाय्य देण्‍यासाठी आरोग्‍य व्‍यवस्‍थेत डॉक्‍टरांची संख्‍या अधिक करण्‍याचे सांगितले. कुपरेज मैदान येथे शौचालयांची व्‍यवस्‍था, अनुयायी ज्‍या-ज्‍या स्‍टेशनवर उतरतात, त्‍याठिकाणी सकृतदर्शनी मोठे दिशादर्शक फलक तसेच चैत्‍यभूमीवर जाणारी बस क्रमांकासह नोंद करण्‍याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget