(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दिव्यांगांसाठी राखीव तीन टक्के निधी महानगरपालिकांनी या आर्थिक वर्षातच खर्च करावा - डॉ. रणजीत पाटील | मराठी १ नंबर बातम्या
" />

दिव्यांगांसाठी राखीव तीन टक्के निधी महानगरपालिकांनी या आर्थिक वर्षातच खर्च करावा - डॉ. रणजीत पाटील

मुंबई ( ९ नोव्हेंबर ) : राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांनी दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला 3 टक्के निधी या आर्थिक वर्षात संपूर्ण खर्च करण्यासाठी तातडीने नियोजन करावे, असे निर्देश नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज दिले.

दिव्यांगांसाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या अंदाजपत्रकाच्या एकूण 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीच्या खर्चाचा आढावा आज डॉ. पाटील यांनी मंत्रालयातील बैठकीत घेतला. यावेळी मुंबई, औरंगाबादसह राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.

दिव्यांगांसाठी प्रशिक्षण, बस पास, आजारपणातील उपचार आदींसाठी विविध 18 बाबींसाठी हा निधी वापरण्यात यावा, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. अशाच प्रकारे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. तसेच दिव्यांग राखीव निधी अद्याप खर्च झाला नसेल, अशा पालिकांनी हा निधी खर्च करण्यासाठी तातडीने आखणी करावी. हा निधी कोणत्याही परिस्थितीत या आर्थिक वर्षात खर्च व्हावा. यासंबंधीचा आढावा यापुढे वेळोवेळी घेण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget