मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : महापालिका सेवेत काम करणाऱ्यांनी पालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या वागण्याने लोकांमध्ये महापालिकेची प्रतिमा तयार होत असते, हे आपण विसरता कामा नये, असा मोलाचा सल्ला महापालिकेचे संयुक्त कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शांताराम नाईक यांनी दिला.
डॉ. नाईक महापालिकेत ३२ वर्ष सेवेत कार्यरत आहे. ते ३० नोव्हेंबर रोजी महापालिकेतून नियत वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त त्यांचा सत्कार पालिका क्षय रुग्णालय आणि म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेच्या संयुक्त विद्यमाने क्षय रुग्णालयाच्या लायब्ररी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रिं विश्वनाथ महाडेश्वर, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि एडवोकेट रचना अग्रवाल उपस्थित होत्या.
महापौर प्रिं विश्वनाथ महाडेश्वर आणि बाबा कदम यांनी आपल्या भाषणातून डॉ. नाईक यांच्या कामांची प्रशंसा केली. त्यांनी डॉ. नाईक यांचा सत्कार ही केला. तसेच यावेळी महापौर प्रिं विश्वनाथ महाडेश्वर यांनी एफ साउथ वार्डचे सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांचा सत्कार केला.
डॉ. नाईक म्हणाले की, महापलिकेचा संबंध हा सर्वांशी जन्माआधी ते मृत्यु पर्यंत असतो. म्हणजे मृत्यु नंतर ही पालिकेच्या स्मशान भूमीतच जावे लागते आणि महिला गरोदर असताना ही तिचा संबंध पालिकेच्या रुग्णालयाशी येतो. त्यामुळे लोकांना महापालिकेबद्द्ल आत्मीयता असणे आवश्यक आहे. त्याकरीता महापालिका सेवेत काम कारणाऱ्यांनी पालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावा.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे बाबी घाड़ीगांवकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
Dr, an excellent person ,dedicated and always striving for the best.we respect your selfless service to the department and to the society.God bless you and Happiness Always to you..May you have a fantastic post retirement life..!!!!