(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पशुधन विमा योजनेसाठी यावर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद | मराठी १ नंबर बातम्या
" />

पशुधन विमा योजनेसाठी यावर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद

मुंबई ( २७ नोव्हेंबर ) : चालू आर्थिक वर्षात पशुधन विमा योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाकडुन 2 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये राज्य हिस्सा मिळून चालु वर्षात 3 कोटी 13 हजार रुपये निधी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे नुकताच उपलब्ध करुन देण्यात आला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 1 ऑक्टोबर 2015 ते 31 मार्च 2017 या कालावधीकरीता पशुधन विमा योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडुन 4 कोटी 97 लाख 79 हजार रुपये व राज्य शासनाकडुन 3 कोटी 94 लाख 55 हजार रुपये अशा प्राप्त झालेल्या एकुण 8 कोटी 92 लाख 34 हजार रुपये निधीमुधन 2 लाख 97 हजार 860 लहान व मोठ्या जनावरांचा विमा उतरविण्यात आला.

आता 2017-18 मध्ये केंद्र शासनाकडुन 2 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये राज्य हिस्सा मिळून चालू वर्षात 3 कोटी 13 हजार रुपये निधी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे नुकताच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरुन ई-निविदा प्रक्रियाद्वारे योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया चालू असुन ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध निधीमधुन राज्यात जनावरांचा विमा उतरविण्याचे कामकाज सुरु करण्यात येणार आहे, असेही विभागाने कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget