(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जे. जे रुग्णालयाच्या जवळपासच्या परिसरातील पदपथ झाले मोकळे | मराठी १ नंबर बातम्या
" />

जे. जे रुग्णालयाच्या जवळपासच्या परिसरातील पदपथ झाले मोकळे

जे. जे. मार्ग व बी. जे. मार्गाच्या पदपथांवरील अनधिकृत बांधकामे निष्कासित

महापालिकेच्या 'ई' विभागाची ६६ बांधकामांवर धडक कारवाई

मुंबई ( ८ नोव्हेंबर ) : बृहन्मुंबई महापालिकेच्या 'ई' विभागात अतिक्रमण व निर्मूलन खात्यामार्फत दि. ०७.११.२०१७ व दि. ०८.११.२०१७ या दोन्ही दिवशी जे. जे. रुग्णालयाच्या जवळच्या परिसरात असणा-या जे. जे. मार्ग व बी. जे. मार्ग येथील पदपथांवरील सुमारे ६६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. यामध्ये १२ अनधिकृत दुकाने (स्टॉल्स), ३० झोपड्या, २१ एक्सटेंशन्स यासह ३ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत, अशी माहिती 'ई' विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी दिली आहे.

'परिमंडळ १' चे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाचे मोलाचे सहकार्य महापालिकेच्या 'ई' विभाग कार्यालयाला लाभले. सदर
निष्कासनाच्या कारवाईमुळे पदपथ पादचा-यांसाठी मोकळे झाले आहेत, ज्यामुळे साहजिकपणे पादचा-यांना आवागमन करणे सुलभ झाल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील सुरळीत होण्यास मदत झाली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिली आहे.

सदर कारवाईसाठी महापालिकेचे २२ कामगार-कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. तर अतिक्रमण निर्मूलन खात्याचे वरिष्ठ निरीक्षक निवाते व सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अमोल सणस यांनी या कारवाईसाठी विशेष परिश्रम घेतले. या कारवाईसाठी १ जेसीबी व ३ डंपर इत्यादी अतिक्रमण निर्मूलन साहित्य वापरण्यात आले, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget