(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ निर्णय - 28 नोव्हेंबर 2017 - राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पुरस्कार

मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : राज्यातील शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविलेल्या विविध योजनांची दखल घेण्याबरोबरच त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढावी यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार देण्याच्या योजनेस आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील उद्योग क्षेत्रातील विविध कामांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा पुरवठा करणे आणि युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शिकाऊ उमेदवारी योजना,लोकसेवा केंद्र, मागेल त्याला प्रशिक्षण, आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण अशा योजनांचा समावेश आहे. अशा योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर संस्थांनी निकोप स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्टतेकडे वाटचाल करावी यासाठी राज्यात उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑगस्ट ते 31 जुलै या शैक्षणिक वर्षातील कामगिरी विचारात घेऊन विभागस्तर आणि राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. विभागस्तरावर प्रथम आलेल्या संस्थांना एक लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे तर राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्यास पाच लाख, द्वितीय येणाऱ्यास तीन लाख आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या संस्थेला दोन लाख रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. याबरोबरच प्रत्येक विजेत्याला प्रशिस्तीपत्रही मिळणार आहे. विभाग आणि राज्यस्तरावर निवड समितीमार्फत पुरस्कारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश व निकाल, संस्थात्मक विकास, मनुष्यबळ विकास व संस्था-औद्योगिक आस्थापना संबंध, प्रशिक्षण गुणवत्ता विकास व रोजगार-स्वयंरोजगार, व्यवस्थापन,महसूल वाढीसाठी संस्थेने केलेले प्रयत्न आदी बाबींचा विचार करण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget