(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला मतदान | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला मतदान

मुंबई ( १९ नोव्हेंबर ) : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य राणे, नारायण तातू यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून एका सदस्याची
निवडणूक घेण्यासाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अनंत ना. कळसे किंवा महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज ज. कुडतरकर किंवा महाराष्ट्र विधानमंडळाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शिंदे यांच्या पुढे दि.27 नोव्हेंबर 2017 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दु 3.00 वाजेपर्यंत, कक्ष क्रमांक 140, पहिला मजला, विधानभवन, बॅकबे रिक्लमेशन, मुंबई-400032 दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे याच ठिकाणी मिळतील.

नामनिर्देशन पत्राची छाननी दि.28 नोव्हेंबर 2017 रोजी दु.12 वा. विधान भवन, बॅकबे रिक्लमेशन मुंबई-400032 येथे करण्यात येईल.

उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवाराकडून देण्यात आलेल्या त्याच्या निवडणूक एजंटाला वरील निर्दिष्ट केलेल्या अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दि. 30 नोव्हेंबर, 2017 रोजी दु.3.00 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास दि.7 डिसेंबर, 2017 रोजी सकाळी 9 ते सायं 4.00 वाजेर्यंत मतदान घेण्यात येईल, असे महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अनंत ना. कळसे यांनी कळविले
आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget