मुंबई ( १० नोव्हेंबर ) : राज्य शासनाच्या विविध विभागात सक्षम मनुष्यबळ सातत्याने विकसित करण्याकरिता राज्य शासनाने टाटा ट्रस्टस् यांच्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकरिता आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची आखणी केली आहे. यात राज्य शासन आणि टाटा ट्रस्टस् यांच्याकरिता 28 उमेदवार 11 महिन्यासाठी मानधन तत्वावर काम करतील.
या उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन होईल. राज्य शासन आणि टाटा ट्रस्टस् यांच्या संयुक्त प्रयत्नाने अंमलात आणण्यात येणारे उपक्रम लोकांपर्यंत अभिनव पद्धतीने पोहोचविण्याचे काम निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सोपविण्यात येणार आहे.
या उपक्रमात निवडण्यात आलेल्या उमेदवारांना प्रती महिना 20 हजाराहून अधिक मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल.
या कार्यक्रमांतर्गत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
संहिता लेखक (एकूण पदे- 17) (मराठी) (13), हिंदी (2) आणि इंग्रजी(2) (13 पदांपैकी 7 पदे ही मुंबई कार्यालय, प्रत्येकी 2 पदे ही पुणे आणि विदर्भ कार्यालय आणि प्रत्येकी 1 पद हे मराठवाडा आणि नाशिक कार्यालयात असेल), पात्रता-जनसंवाद/पत्रकारिता/संज्ञापन यातील पदवी किंवा जाहिरात, नाट्यशास्त्र, चित्रपट विषयक पदवी अथवा पदवीनंतर संबंधित विषयातील लघुअभ्याक्रमसोशल मीडियासाठी संहिता लेखक - (एकूण पदे - 2) - पात्रता – पदवी + सोशल मीडिया या क्षेत्रातील लघु अभ्याक्रम. ग्राफिक डिझाईनर - (एकूण पदे - 4), पात्रता- फाईन/ॲप्लाईड आर्टमधील पदविका/पदवी. माहिती तंत्रज्ञान साहाय्यक-(एकूण पदे - 2), पात्रता- बीएस्सी, एमएस्सी,एमटेक, बीई(आयटी) (सीएस). व्हिडिओ ॲनिमेटर -(एकूण पदे - 2), पात्रता- बारावी + ॲनिमेशन विषयातील पदविका. संगीत संयोजक -(एकूण पदे - 1), पात्रता- बारावी+ संगीत विषयातील पदविका.
वरील 28 पदांपैकी कोणतीही पदे कमी अथवा अधिक करण्याचा अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्टस् हे राखून ठेवत आहेत.
अर्जदाराने पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे
• अर्जदाराने आवश्यक पदवी/पदविका किमान 55टक्के गुणांसह अथवा ए ग्रेडसह प्राप्त केलेली असावी.
• संगणक आणि सोशल मीडिया यांचे ज्ञान आणि एमएस ऑफिस तसेच ज्या विषयात काम करण्यासाठी अर्ज केला आहे त्या विषयातील आवश्यक संगणक प्रणालीची माहिती असणे आवश्यक.
• 30 सप्टेंबर 2017 रोजी अर्जदाराचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
• संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या तसेच शासन किंवा शासनाशी संबंधित प्रकल्प किंवा योजनेतील अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
• हा कार्यक्रम म्हणजे शासकीय सेवा नसेल. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ उमेदवारांना देण्यात येणार नाहीत.
मा. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्टस् यांच्यातर्फे यापूर्वी राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत आंतरवासिता कालावधी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम लागू नाही. maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाची सुविधा 11 ते 22 नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा