(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिर्व्हसिटी ऑफ साऊथ वेल्स यांच्यात सामंजस्य करार | मराठी १ नंबर बातम्या
" />

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिर्व्हसिटी ऑफ साऊथ वेल्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई ( १८ नोव्हेंबर ) : महाराष्ट्रातून साऊथ वेल्स विदयापीठामध्ये संशोधन करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनाचा वापर लोकल टू ग्लोबल करावा, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

आज सहयाद्री अतिथीगृह येथे ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्र कुलगुरु लॉरी पिअर्सी यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्र कुलगुरु लॉरी पिअर्सी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिध्दार्थ खरात यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

तावडे यांनी सामंजस्य करारानंतर बोलताना सांगितले की, महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या दरवर्षी जवळपास 70 लाख आहे. मात्र पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करणाऱ्यांची
संख्या कमी आहे. आता या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी ऑस्ट्रेलियाच्या विदयापीठामध्ये जाऊन संशोधन करणार आहेत. या विद्यार्थ्यांचे संशोधन देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरताना
महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचा उपयोग होणे आवश्यक आहे. दरवर्षी महाराष्ट्रातून 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळते त्यांचाही उपयोग राज्याच्या विकासासाठी व्हावा, असे तावडे म्हणाले.

साऊथ वेल्स विदयापीठाचे प्र कुलगुरु लॉरी पिअर्सी यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले की, महाराष्ट्राला शैक्षणिक, आर्थिक, वाणिज्यिक, सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे साऊथ वेल्स विद्यापीठाला
महाराष्ट्र राज्याबरोबर सामंजस्य करार करताना आनंद होत असून या करारारमुळे संशोधन क्षेत्रात वेगळे काही करु इच्छिणाऱ्यांना येथील विद्यापीठात संशोधन करण्याची चांगली संधी मिळेल. याचा फायदा ऑस्ट्रेलियाबरोबरच महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारताला होणार आहे.

ऑस्ट्रेडचे वाणिज्य आयुक्त पीटर कोलेमन, अमित दासगुप्ता, मोहा व्यास, स्गिन्धा मोईत्रा, ग्रेन ॲन लोबो, महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.शशिकला वंजारी, शिक्षण संचालक डॉ.धीरज माने, रोहित मनचंदा आदी मान्यवर उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठात महाराष्ट्राच्या 10 पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅनबेरा कॅम्पसमध्ये तर 10 पीएचडी करणाऱ्या विदयार्थ्यांना सिडनी कॅम्पसमध्ये राहून
शिकण्याची संधी मिळणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget