(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); "कोटपा" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार - गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील | मराठी १ नंबर बातम्या
" />

"कोटपा" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार - गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

मुंबई ( १४ नोव्हेंबर ) : मुलांना तंबाखू सेवनापासून वाचविण्यासाठी सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ (कोटपा) तसेच जे जे अधिनियमाअंतर्गत असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज येथे दिली.

बालदिनानिमित्त टाटा कॅन्सर रुग्णालय आणि संबंध हेल्थ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने टाटा रुग्णालयात आयोजित “तंबाखू पासून मुलांचे संरक्षण” या विषयावर आयोजित चर्चासत्रात राज्यमंत्री डॉ. पाटील बोलत होते.

डॉ. पाटील म्हणाले, राज्यात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर अंकुश ठेवणारे अनेक कायदे आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी प्रामुख्याने मुलांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे तंबाखूची अवैध विक्री रोखण्यासाठी लवकरच एक हेल्पलाईन सुरू केली जाईल.

यावेळी विद्याथ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना गृहराज्य मंत्री डॉ. पाटील यांनी उत्तरे दिली. तंबाखूच्या अवैध विक्रीमुळे मुलांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यावर उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, तंबाखू सेवनापासून मुलांना लांब ठेवण्यासाठी शाळेप्रमाणेच पालकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ शाळेच्या 100 यार्ड परिसरात सिगारेट तंबाखूजन्य पदार्थानावर बंदी घालून चालणार नाही, तर ही अवैध विक्री रोखण्यासाठी त्या शहरात किंवा संपूर्ण गावातच लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget