मुंबई ( २८ नोव्हेंबर ) : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्र नगरीच्या पुनर्विकासाचा आराखडा सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबविण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्वतः मान्यता दिली.
दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये जागतिक दर्जाचे चित्रीकरण सुविधा, पर्यटन व मनोरंजन सुविधा निर्माण करण्यासंदर्भात आज मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी चित्रनगरीचा पुनर्विकास आराखडा महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने समिती समोर मांडला.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव वंदना कृष्णा, महामंडळाच्या जयश्री भोज, आराखडासंदर्भात नेमलेले सल्लागार नितीन देसाई,वास्तुविशारद शशी प्रभू आदी उपस्थित होते.
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये पुनर्विकासाद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारीतून जागतिक दर्जाच्या चित्रीकरणाच्या सुविधा निर्माण करणे, तसेच मनोरंजन व पर्यटनाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. हा पुनर्विकास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे का?, तसेच चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी नवीन आधुनिक स्टुडिओ उभारणे व बॉलिवूड टुरिझम सुरू करण्यासंदर्भात आर्थिक निती ठरवणे, येथून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी महसुली भागीदारी ठरविणे, उत्पन्न मिळण्याचे मार्ग, आदी आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्यासाठी ‘एसबीआय कॅप’ सारख्या संस्था नेमण्याच्या अटीवर मुख्यमंत्र्यांनी या पुनर्विकासास मान्यता दिली.
चित्रनगरीच्या पुनर्विकासाचे काम पूर्णपणे पारदर्शकपणे व पूर्णतः व्यावसायिकरित्या व्हायला हवे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान कॅबिनेट हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपट चित्रिकरणाविषयीचे ‘लोकेशन कम्पेडियन बुक’चे प्रकाशनही करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा