(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्राच्या धर्तीवर उत्तरप्रदेशातील डॉक्टरांना प्रशिक्षण | मराठी १ नंबर बातम्या
" />

महाराष्ट्राच्या धर्तीवर उत्तरप्रदेशातील डॉक्टरांना प्रशिक्षण

मुंबई ( ३० नोव्हेंबर ) : महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्तरप्रदेश सरकार राबविणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंग केले.

लोअर परेल येथील पिरॅमल टॉवर येथे हार्वर्ड जागतिक आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य क्षेत्रातील आव्हान, सुधारणा आदी विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्राला मुंबईतील जागतिक दर्जाच्या रुग्णालयाचे प्रतिनिधी, आरोग्य संस्था, ओषध निर्माण कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उत्तरप्रदेश सरकारने शहरी आणि ग्रामीण आरोग्य सेवेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार आरोग्य विषयक सुधारणा केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा दिल्या जात आहेत. तसेच राज्यात डॉक्टरांच्या निवृत्तीमुळे रिक्त जागा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीतून नियुक्त झालेल्या डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिल्या जाणारा प्रशिक्षण कार्यक्रमाचा अवलंब केला जाणार आहे, असेही सिंग यांनी यावेळी सांगितले.

उत्तरप्रदेशात सार्वजनिक वाहतूक सुविधा, रेल्वे सेवा, रस्ते आणि विमान सेवा आदी सुविधा झपाट्याने निर्माण केल्या जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यासाठी ‘उत्तरप्रदेश इन्व्हेस्टर समिट 2017’ चे आयोजन करण्यात आले असून नामांकित रुग्णालय, आरोग्य संस्था आणि औषध निर्माण कंपन्यांनी उत्तरप्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget