(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मॉडेल टाउन रेसिडेंट असोसिएशन आणि स्वप्नाक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने बालदिन सोहळा २०१७ | मराठी १ नंबर बातम्या
" />

मॉडेल टाउन रेसिडेंट असोसिएशन आणि स्वप्नाक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने बालदिन सोहळा २०१७

मुंबई ( १६ नोव्हेंबर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांच्या वतीने शनिवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वा. लहान मुलांसाठी "बालदिन"कार्यक्रम अंधेरीे प.येथील सातबंगला मॉडेल टॉउन येथे चाचा नेहरू उद्यानात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, आमदार विभाग प्रमुख अॅड. अनिल परब, शैलेष फणसे, राजुल पटेल, राजेश शेटटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मॉडेल टाउन रेसिडेंट असोसिएशन आणि स्वप्नाक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने या बालदिनानिमित बाल गोपाळांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार असून यावेळी पारंपरिक नुत्यचा गीतांचा कार्यक्रम, बाळगोपांळासाठी खाऊ वाटप ,फटाक्यांची आतिशबाजी, अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र(बाळा)आंबेरकर यांच्यासह प्रमुख आयोजक संजीव कल्ले .राजेश ढेरे, अशोक मोरे, अनिल राऊत, योगेश गोरे, सचिन नायक, मनोहर नायक, शौकत विराणी, संतोष साटम, सुरेश बंगेरा , उमा ढेरे, ममता गुप्ता, हे अविरत परिश्रम घेत आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget