जहांगीर आर्ट गॅलरी समोरील चौकातील खुले व्‍यासपीठ जागेची केली अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त यांनी पाहणी

मुंबई ( ९ नोव्हेंबर ) : सांस्‍कृतिक, कला, नाटय़, चित्रपट, संगीत, फॅशन, महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय लोकनृत्‍यांचे विविध प्रकार मुंबईकर नागरिक व मुंबईला भेट देणाऱया देश-विदेशातील पर्यटकांना पाहता यावेत म्‍हणून सदर व्‍यासपीठ हे प्रथमच उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. या विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापली कला या व्‍यासपीठावर रविवार, दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्‍यान सादर करता येणार आहे.

सदर जागेची अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए. एल. जऱहाड यांनी ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर व संबंधित एमटीडीसीच्‍या अधिकाऱयांसमवेत आज (दिनांक ०९ नोव्‍हेंबर, २०१७) पाहणी केली. दिनांक १९ नोव्‍हेंबर २०१७ पासून सुरु होणाऱया या सांस्‍कृतिक, कला, नाटय़, चित्रपट व संगीत कार्यक्रमास लागणाऱया सर्व सेवा-सुविधांची पाहणी केली.

अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए. एल. जऱहाड यांनी हा चौक व आजुबाजूच्‍या पदपथांची दुरुस्‍ती, चौकाची रंगरंगोटी व वृक्ष फाद्यांची योग्‍यरित्‍या छटाई तसेच हा परिसर आकर्षक दिसेल याबाबत कार्यवाही करण्‍याचे संबंधीतांना आदेश दिले.

के. दुभाष मार्गावर ज्‍या ठिकाणी सदर “खुले व्‍यासपीठ” असणार आहे, त्‍या रस्‍त्‍यावरील वाहनतळ शनिवार, दिनांक १८ नोव्‍हेंबर, २०१७ दुपारनंतर बंद करण्‍यात येणार असून रविवार, दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ सायंकाळपर्यंत सदर वाहनतळ बंद राहील, असे महापालिकेने कळविले आहे. या ठिकाणी असलेले इतर वाहनतळ नेहमीप्रमाणेच वाहनांच्‍या पार्किंगसाठी उपलब्‍ध राहणार असल्‍याचेही पालिकेने कळविले आहे.

बृहन्‍मुंबई महापालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ पासून मे, २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी होणाऱया “खुले व्‍यासपीठ” या संकल्‍पनेतून मुंबई शहराची ओळख संपूर्ण जगभर पोहचविण्‍यासाठी महत्‍वपूर्ण भूमिका बजावणार असल्‍याचे प्रतिपादन अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए. एल. जऱहाड यांनी केले आहे. तसेच अशा व्‍यासपीठामुळे मुंबई शहराच्‍या पर्यटनाला विशेषतः भारतीय पर्यटनाला अत्‍यंत पोषक अशी भूमिका बजावणार असल्‍याचे जऱहाड यांनी सांगितले. या महोत्‍सवात जास्‍तीत-जास्‍त कलावंतानी सहभागी व्‍हावे म्‍हणून बृहन्‍मुंबई महापालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍ति‍करित्‍या जोरदार प्रयत्‍न करीत असल्‍याचेही जऱहाड यांनी सांगितले.

हे खुले व्‍यासपीठ विविध कलागुण सादर करणाऱया कलावंतांसाठी एक पर्वणी ठरणार असल्‍याने आजपासून अनेक कलावंतानी दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ रोजी होणाऱया कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रि‍या सुरु केली आहे. तसेच या कलाकारांच्‍या विविध कलागुणांना प्रोत्‍साहन मिळावे, यासाठी मुंबई शहराचा सांस्‍कृतिक वारसा वृद्धि‍गत करण्‍यासाठी महत्‍वपूर्ण योगदान देणाऱया विविध क्षेत्रातील नामवंत, प्रतिभावंत कलावंतही दिनांक १९ नोव्‍हेंबर, २०१७ च्‍या कार्यक्रमास सायंकाळी ५.०० वाजता सादर करणाऱया कलाकारांना प्रोत्‍साहन मिळावे म्‍हणून उपस्थित राहण्‍याचे मान्‍य केले आहे.

महाराष्‍ट्रीय तसेच भारतीय विविध कलागुणांना दर रविवारी खुले व्‍यासपीठ उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्‍य असे खुले व्‍यासपीठ अशा कलाकारांसाठी दर रविवारी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. सदर खुले व्‍यासपीठ हे मे २०१८ अखेरपर्यंत दर रविवारी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० दरम्‍यान कलाकारांसाठी उपलब्‍ध असणार आहे.

या कार्यक्रमात भाग घेणाऱया कलाकारांनी महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या महाव्‍यवस्‍थापक स्‍वाती काळे (भ्रमणध्‍वनी क्रमांक ८४२२८२२००३) व बृहन्‍मुंबई महानगरपालिका ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त किरण दिघावकर (भ्रमणध्‍वनी क्रमांक ९९२०१८५२०१, कार्यालयाचा दूरध्‍वनी क्रमांकः ०२२२२६६७०३८, फॅक्‍सः ०२२२२६६०३९६), ‘ए’ विभागाचे तक्रार निवारण अधिकारी अमोल पाटील (भ्रमणध्‍वनी क्रमांक ९१६७४८०५३६), ‘ए’ विभागाचे कनिष्‍ठ अभियंता निलेश तोरसकर (भ्रमणध्‍वनी क्रमांक ९८१९३२३८५०) यांचेशी संपर्क साधावा, असेही संयुक्तिकपणे कळविण्‍यात आले आहे.

विविध क्षेत्रांतील कलाकारांना आपापल्‍या कला स्‍वयंस्‍फुर्तीने सादर करण्‍यासाठी मोफत व्‍यासपीठ उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. तरी कलाकारांनी जास्‍तीत-जास्‍त संख्‍येने आपापली नांवे नोंदवावीत, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे केले आहे. तसेच मुंबईकर नागरिक आणि पर्यटकांनीही कलाकारांनी सादर केलेल्‍या विविध कलागुणांचा मनमुराद आनंद लुटावा नि कलाकारांना प्रोत्‍साहित करावे, असेही कळविण्‍यात आले आहे.

यासंबंधी अधिक माहिती http://m.facebook.com/mcskalaghoda/ या फेसबुक पेजवर संपर्क साधावा व जास्‍तीत-जास्‍त कलाकारांनी आपली नांवे नोंदवावी, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका व महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्‍तपणे केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget