शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या पाचव्‍या स्‍मृतीदिनानिमित्त आयोजित पूर्वतयारी बैठक संपन्‍न

मुंबई ( ६ नोव्हेंबर ) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या १७ नोव्‍हेंबर २०१७ च्‍या पाचव्‍या स्‍मृतीदिनानिमित्त मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज (दिनांक ०६ नोव्‍हेंबर २०१७) रोजी महापालिका मुख्‍यालयातील स्‍थायी समिती सभागृहात आयोजित पूर्वतयारी बैठकीत महापौरांनी महापालिका अधिकाऱयांकडून तयारी कामांचा आढावा घेतला.

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्‍त अजोय मेहता सभागृह नेता यशवंत जाधव, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्‍यक्ष अनंत नर, शि‍क्षण समिती अध्‍यक्षा शुभदा गुढेकर, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, उप आयुक्त (परिमंडळ - २) नरेंद्र बर्डे, उप आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत, , उप आयुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्‍त रमाकांत बिरादार, शिक्षणाधिकारी महेश पालकर हे मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्‍या प्रारंभी, महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी स्‍मृतीदिनानिमित्त याठिकाणी आवश्‍यक त्‍या सेवासुविधा पुरविण्‍याबाबत महापालिका अधिकाऱयांनी केलेल्‍या तयारी कामांचा आढावा घेतला.त्‍यानंतर
संबधित जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्‍त रमाकांत बिरादार यांनी स्‍मृतीदिनानिमित्त याठिकाणी करण्‍यात येणाऱया सेवासुविधांची माहिती दिली. त्‍यानंतर सभागृह नेता यशवंत जाधव यांनी याठिकाणी
रुग्‍णवाहि‍केची व्‍यवस्‍था, प्रथमोपचार केंद्र, पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्‍याऊची व्‍यवस्‍था, अभिवादनासाठी येणाऱया सैनिकांचे उन्‍हापासून संरक्षण व्‍हावे यासाठी छताची निर्मिती तसेच स्‍मृतीदिनानिमित्त कायमस्‍वरुपी ५० लाख रुपये निधींची महापालिका अर्थसंकल्‍पात तरतूद करण्‍याची मागणी केली. त्‍यानंतर स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगांवकर यांनी अति‍रिक्‍त मोबाईल टॉयलेटची व्‍यवस्‍था करणे तसेच परिसर प्रकाशमान राहील यासाठी अतिरिक्‍त लाईटची व्‍यवस्‍था करणे व शिवाजी पार्क मैदानातील अतिरिक्‍त गवत काढण्‍याची सूचना महापालिका अधिकाऱयांना केली.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्‍या सूचनांची दखल घेऊन त्‍याप्रमाणे सर्व त्‍या सोयीसुविधा पुरविण्‍याचे आदेश संबधित महापालिका अधिकाऱयांना यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget