या कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, आमदार विभाग प्रमुख अॅड. अनिल परब, शैलेष फणसे, राजू पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांना महोत्स्वास्थळी दीपप्रज्वलन करण्याची विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी स्वतः हुन बालगोपाळांना बोलावून त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन केले. सोबत त्यांनी आकाशात फुगे सोडण्याचा कार्यक्रम ही त्यांच्याच हस्ते केला.
अभ्यासाप्रमाणे लहान मुलांना खेळ आणि मनोरंजनाची गरज असून या बालदिनाच्या कार्यक्रमातून ती पूर्ण होत असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आंनद व्यक्त करत कार्यक्रमाचे आयोजक देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांचे कौतुक केले.
आंबेरकर यांनी त्यांचे मॉडेल टाउन रेसिडेंट असोसिएशन आणि स्वप्नाक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
मॉडेल टाउन रेसिडेंट असोसिएशन आणि स्वप्नाक्षय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने या बालदिनानिमित बाल गोपाळांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ या महोत्सावात करण्यात आला.
यावेळी पारंपरिक नुत्यचा गीतांचा कार्यक्रम, बाळगोपांळासाठी खाऊ वाटप ,फटाक्यांची आतिशबाजी, अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी देवेंद्र(बाळा)आंबेरकर यांच्यासह प्रमुख आयोजक संजीव कल्ले .राजेश ढेरे, अशोक मोरे, अनिल राऊत, योगेश गोरे, सचिन नायक, मनोहर नायक, शौकत विराणी, संतोष साटम, सुरेश बंगेरा , उमा ढेरे, ममता गुप्ता यांनी अविरत परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा