(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधी अभ्यासक्रमाच्या पुनर्मुल्यांकनाचे निकाल लवकरच | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधी अभ्यासक्रमाच्या पुनर्मुल्यांकनाचे निकाल लवकरच

- उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांचे आश्वासन

मुंबई ( १३ नोव्हेंबर ) : विधी अभ्यासक्रमाबरोबरच अन्य अभ्यासक्रमांच्या पुनर्मुल्यांकनाचे रखडलेले निकाल या अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा सुरू होण्या अगोदर जाहिर करण्यात येतील, असे आश्‍वासन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे परिक्षा नियंत्रक घाटुळे यांनी उच्च व तंंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांना दिले.

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत राज्यमंत्री वायकर यांनी सोमवारी मुंबई विद्यापीठात बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दायनंद शिंदे, डॉ. विष्णु मगरे कुलसचिव दिनेश कांबळे, युवासेनेचे प्रदिप सावंत, महादेव जगताप, शशिकांत झोरे, राजन शेलार आदि पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे मिळुन अद्याप २७, ७४८ उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन होणे बाकी आहे. २० नोव्हेंबरपासून सत्र परिक्षा सुरू होत आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहूनही ती गहाळ झाल्याने शुन्य मार्क देण्यात आले आहेत, अशी माहिती युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी राज्यमंत्री यांना दिली. याप्रश्‍नी सत्र परिक्षा सुरू होण्याअगोदर या सर्व पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात येईल, असे आश्‍वासन परिक्षा नियत्रंक घाटुळे यांनी राज्यमंत्री यांना दिले. त्यातच ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ आहेत तसेच ज्यांना शुन्य मार्क देण्यात आले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्यांना अन्य विषयांमध्ये मिळालेले गुण बघून सरासरी गुण गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांना देणे शक्य आहे का?, याची तपासणी करुन निर्णय घ्यावा, अशी सुचना राज्यमंत्री वायकर यांनी परिक्षा नियंत्रकांना दिल्या.

परिक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना सप्लिमेंट न देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला होता. परंतु हा निर्णय योग्य नसून, जर का एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षे दरम्यान सप्लिमेंटची गरज भासली तर त्याला प्रथम दिलेली उत्तरपत्रिका पुर्ण लिहिली आहे की नाही, याची तपासणी करुन दुसरी सप्लिमेंट देण्यात यावी, असे निर्देशही वायकर यांनी मुंबई विद्यापीठच्या परीक्षा विभागातील अधिकार्‌यांना दिले.

त्याचबरोबर पुढच्यावर्षी परीक्षा झाल्यावर ४५ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यावर कटाक्ष ठेवण्यात यावा. त्यासाठी उत्तरपत्रिका तपासण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये ज्या काही त्रुटी असतील, त्या तात्काळ दुर करव्यात, अशा सुचनाही राज्यमंत्री वायकर यांनी परिक्षा विभागाला दिल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget