(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 : राज्य शासनाने खरेदी केलेली तूर स्वस्त धान्य दुकानात विक्रीस मंजुरी | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 : राज्य शासनाने खरेदी केलेली तूर स्वस्त धान्य दुकानात विक्रीस मंजुरी

मुंबई ( २१ नोव्हेंबर ) : नाफेडच्या सहकार्याने राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून स्वस्त धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर तूरडाळ विक्री करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानांत 55 रूपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ उपलब्ध होणार आहे.

राज्यात 2016-17 च्या हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजनांतर्गत तुरीची हमी भावाने खरेदी केली होती. यामध्ये राज्य शासनाने स्वतःच्या निधीतून बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत 25 लाख 25 हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. या तुरीच्या भरडाईस राज्य शासनाने परवानगी दिली होती. ही भरडाई केलेली तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून रास्त भावात विक्रीसाठी काढण्यास आज राज्य मंत्रिमंडाळाने मान्यता दिली. त्यानुसार ही तूरडाळ आता प्रतिकिलो 55 रूपये दराने शिधापत्रिकाधारकास मिळणार आहे.

याबरोबरच राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये 1 किलोच्या पॅकिंगसाठी 80 रूपये तर 50 किलोच्या पॅकींगसाठी 3750 रूपये याप्रमाणे तूरडाळीचा पुरवठा करण्यासही कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागाला तीन लाख क्विंटल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला 2160 क्विंटल आणि महिला व बालविकास विभागाला तीन लाख 60 हजार 600 क्विंटल तूरडाळ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गृह विभाग, सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विकास विभागालाही याच दरानुसार तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ई-निविदेद्वारे डाळीची खुल्या बाजारात विक्री ऑफसेट किंमत 55 रूपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget