(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); करमणूक उद्योग क्षेत्रात मेट्रो चित्रपटगृहाचे मोठे योगदान - मुख्यमंत्री | मराठी १ नंबर बातम्या
" />

करमणूक उद्योग क्षेत्रात मेट्रो चित्रपटगृहाचे मोठे योगदान - मुख्यमंत्री

मुंबई ( २९ नोव्हेंबर ) : चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत आणि करमणूक उद्योग क्षेत्रात मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहाचे मोठे योगदान आहे. या चित्रपटगृहासंदर्भात आपल्या अनेक आठवणी आहेत. या चित्रपटगृहाचे नाव आता मेट्रो ऐवजी मेट्रो आयनॉक्स असे होत आहे. या चित्रपटगृहाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मेट्रो चित्रपटगृहात आज यासंदर्भात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, चित्रपट निर्माते - दिग्दर्शक सुभाष घई, सूरज
बडजात्या, बोनी कपूर, आयनॉक्स ग्रुपचे संचालक सिद्धार्थ जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

फिल्मसिटीच्या पुनर्विकासाला मान्यता

मुख्यमंत्री म्हणाले की, सिनेरसिकांच्या मनात मुंबईतील फिल्मसिटीला विशेष स्थान आहे. या फिल्मसिटीच्या पुनर्विकासाला राज्य शासनामार्फत कालच मान्यता देण्यात आली आहे. या चित्रनगरीत जागतिक दर्जाच्या चित्रीकरण सुविधा उभ्या करण्यात येतील. शिवाय पर्यटनविकासाच्या दृष्टीनेही चित्रनगरीचा विकास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

करमणूक उद्योगाला चालना देण्यासाठी चित्रपटगृहांची संख्या वाढणे आवश्यक आहे. यासंदर्भात आपली प्रोड्युसर्स गिल्डसमवेत चर्चा झाली असून त्यांनी प्रस्ताव तयार करावा, असे आपण त्यांना सुचविले आहे. शासनामार्फत या कामी पूर्ण प्रोत्साहन दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्व मान्यवरांनी मेट्रो चित्रपटगृहासंदर्भातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमिताभ बच्चन, सुभाष घई, सूरज बडजात्या, बोनी कपूर यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget