(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); फंडटॉनिकच्या वतीने पुणे स्टार्टअप मॅरेथॉन २०१७ लाँच | मराठी १ नंबर बातम्या
" />

फंडटॉनिकच्या वतीने पुणे स्टार्टअप मॅरेथॉन २०१७ लाँच

पुणे ( १६ नोव्हेंबर ) : ७००हून अधिक एंजल गुंतवणूकदारांचे एंजल नेटवर्क असलेल्या फंडटॉनिकच्या वतीने आज पुणे स्टार्टअप मॅरेथॉन २०१७ चा लाँच करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पुण्यातील बाणेरमध्ये कंपनीकडून १५००० स्क्वेअर फुटांची सर्व सोयींनी युक्त अशी को-वर्किंग स्पेसही उपलब्ध करून देण्यात आल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला 5 एफ वर्ल्ड चे संस्थापक आणि नॅसकॉमचे माजी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, फंडटॉनिकचे संस्थापक अक्षित गुप्ता, वायजेन कॅपिटलचे संस्थापक जिग्नेश जैन आणि स्केलमाइंड्सचे संस्थापक नयनेश कपाडिया हे मान्यवर उपस्थित होते. फंडटॉनिकच्या को-वर्कस स्पेसमध्ये २५ नोव्हेंबरला मुख्य कार्यक्रम होणार असून, त्यासाठी जगभरातील उत्तम वक्ते, मेंटॉर आणि एंजल गुंतवणूकदार उपस्थित राहणार आहेत. हे सर्व मान्यवर केवळ स्टार्टअपमध्ये गुंतवणूकच करणार नसून, स्टार्टअप बिझनेसला नव्या उंचीवर नेण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या उत्पादन विकसन, व्यवसाय नीती आणि व्यवसाय विकसनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही करणार आहेत. फंड मॅनेजर आणि स्टार्टअप यांच्याबरोबरच आयपीओंच्या माध्यमातून खूप कमी काळात यशस्वी स्टार्टअप उभारणारे तसेच त्यांचा व्यवसाय जगभर पसरवणारे दिग्गजही या वेळी मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात पुणे स्टार्टअप इको-सिस्टीम तयार करण्यासाठी काही विशेष उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे. उदाहर्णार्थ- सेक्टर अग्नोस्टिक सीड-फंडेड ग्लोबल अक्सलेटरचा लाँच, सीड फंडेड आरोग्य सुविधांवर केंद्रीत अक्सलेटरचा लाँच, पुणे स्टार्टअपना आसियान देश, युरोपातील देश व इतर देशांच्या पातळीवर नेण्यासाठीचा एक्स्चेंज कार्यक्रम व इतर अनेक उपक्रम. प्रमुख पाहुण्यांमध्ये 5 एफ वर्ल्ड चे संस्थापक आणि नॅसकॉमचे माजी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन आणि कॅटफिटेक्स स्पेशल फोर्सेस (भारतीय लष्कर) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे संस्थापक निवृत्त लेफ्टनंट कर्नल राकेश कृष्णन यांचा समावेश आहे. ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. स्केलमाइंड्स,बिल क्लाउड, पुणे जीडीपी, वायजेन कॅपिटल, आयआयटी कानपूर माजी विद्यार्थी संघटना या महत्त्वपूर्ण ब्रँडचा या उपक्रमाला पाठिंबा आहे. या कार्यक्रमाला सिडबी/ वर्ल्ड बॅकेचे प्रमुख सल्लागार संजीव झा, अटम टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अमरेंद्र साहू, येस बँकेचे वरिष्ठ अध्यक्ष अजय देसाई, ग्लोबल टेक्स्टाइल्स इंडिया लिमिटेडचे सीईओ भाविन पारीख, सनबर्स्ट हेल्थकेअरच्या सीईओ आणि एमडी डॉ. सुजाता मलिक , ऑटोलाइन इंडस्ट्रीजचे सहसंस्थापक एम. राधाकृष्णन, बिझनेस बिलडेस्कचे प्रमुख शंतनू सामंता, स्पिंटा ग्लोबल अक्सलेटरचे सहसंस्थापक मितेन मेहता हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.


5 एफ वर्ल्ड चे संस्थापक आणि नॅसकॉमचे माजी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन म्हणाले, ̒ एक गुंतवणूकदार आणि डिजिटल स्टार्टअप इको-सिस्टीममधील सहभागी सदस्य म्हणून 5 एफमध्ये आम्ही डिजिटल भविष्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो. डिजिटल भवितव्य आणि उद्योगातील ४.० ट्रान्सफॉर्मेशन हे इको-सिस्टीममध्येच सामावेलेले आहे. जिथे मोठे ग्राहक, गुंतवणूकदार आणि अग्रिगेटर्स अनेक नव्या कंपन्यांसह सहभागी होतील. हे बदल घडून येण्यासाठी समन्वय करण्याची मोठी भूमिका फंडटॉनिकसारखे कार्यक्रम पार पाडतील. ̕

फंडटॉनिकचे संस्थापक अक्षित गुप्ता म्हणाले, ̒ पुण्यातील एका उपनगरामध्ये आमच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने पुण्याच्या मार्केटमधील स्टार्टअपसाठी अर्ज करणार्यांची आणि गुंतवणूकदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. येत्या सहा महिन्यांत पुण्यातील पाच स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची आमची योजना आहे. सध्या आम्ही बाणेरमध्ये उपलब्ध करून दिलेली सर्व सोयींनी युक्त को-वर्किंग स्पेस १५००० स्क्वेअर फुटांची असून, येत्या सहा महिन्यांत आम्ही ही स्पेस ४०००० स्क्वेअर फुटांपर्यत वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ̕

अक्षित गुप्ता आणि भाविन पारीख यांनी गेल्या वर्षी १५० एंजल गुंतवणुकदारांच्या सोबतीने सुरू केलेल्या एंजल गुंतवणूकदार नेटवर्कमध्ये सध्या ७०० गुंतवणूकदार असून दर महिन्याला त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी ३०० ते ४०० स्टार्टअपचे अर्ज येतात. सध्या कंपनीत ५० हून अधिक मेंटॉर आहेत, हे मेंटॉर स्टार्टअपना मार्केटिंग स्ट्रॅटर्जीबाबत मार्गदर्शन करतात. पुढच्या काही महिन्यांत या मेंटॉरची संख्या ५०० करण्याचा कंपनीचा मनोदय आहे.

स्केलमाइंड्सच्या अक्सलेटर आणि प्री-अक्सलेटर उपक्रमांमुळे स्टार्टअपची कल्पना किती व्यवसाय करण्याच्या दृष्टीने किती संयुक्तिक आहे हे लक्षात येते. फंडटॉनिक स्केलमाइंड्सच्यासोबत काम करते. स्टार्टअपच्या विश्लेषणाचा अभ्यास करून कोणत्या स्टार्टअपनमध्ये गुंतवणूक करावी याबद्दल फंडटॉनिक गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करते.

नयनेश कपाडिया यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये स्थापन केलेली स्केमाइंड्स अक्सलेटरची दरवर्षी २० स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची योजना असून ते फंडटॉनिकच्या मेंटर टीमसोबत काम करतात. कस्टमाइज्ड अक्सलेटर उपक्रमामुळे निवडलेल्या स्टार्टअपना ३००० हून अधिक गुंतवणुकदारांच्या नेटवर्कशी विशेष टाय-अप करायची संधी उपलब्ध होते. या गुंतवणूकदारांना मार्केटमधील अग्रगण्य एंजल नेटवर्कचा पाठिंबा असतो. त्यामध्ये फंडटॉनिकमधील गुंतवणूकदार, आयएएन, एएच व्हेंचर्स आणि इतर एंजल्सचाही समावेश होतो. केई कॅपिटलचे नवीन होनागुडी, स्पिंटा ग्लोबल अक्सलेटरचे मितेन मेहता, येस कॅपिटलचे अक्सेल आणि बोरिस, इक्वॅनिमिटी इन्व्हेस्टमेंट्सचे धनराज चांद्रियानी आणि राजेश सेहगल तसेच फंडटॉनिकचे सहसंस्थापक भाविन पारीख हे सर्व स्केलमाइंड्सशी मेंटॉर म्हणून संलग्न आहेत.

स्केलमाइंड्सकडे नुकतेच २,३०० स्टार्टअपचे अर्ज आले होते त्यापैकी केवळ पाच जणांची अंतिम निवड जाली. स्केलमाइंड्सने अक्सलेटर उपक्रमासाठी आणखीही अर्ज मागवले असून येत्या सहा महिन्यांत २० स्टार्टअपनमध्ये गुंतवणूक करण्याची स्केलमाइंड्सची योजना आहे. निवडलेल्या पाच स्टार्टअपना १०० दिवसांच्या अक्सलेटर उपक्रमासाठी कमीतकमी १५ हजार अमेरिकी डॉलरचे (१० लाख रुपये) सीड फंडिंग देण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यवासाय नीती आणि व्यवसाय विकसनाबाबतचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

निवड झालेल्यांमध्ये खालील स्टार्टअपचा समावेश आहे. -

मायफुटबॉल - भारतीय फुटबॉलप्रेमींसाठीचे वन-स्टॉप अप,

टॅक्सजिनी – हा ३० मिलियन एमएसएमईंना जीएसटीसाठी मदत करणारा मंच,

जीएआयए बीस्पोक - भारतीय नोकरदार महिलांसाठी वन स्टॉप मंच, एचआरआयएस365.com – ऑनालाइन / क्लाउडवर आधारित ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम (एचआरएमएस),

नेव्हीगर्स – पर्यटकांना जोडण्यासाठी उपयुक्त असा व्यवसाय.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget