(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बॅंक ऑफ महाराष्‍ट्रने साजरा केला संविधान दिन | मराठी १ नंबर बातम्या
" />

बॅंक ऑफ महाराष्‍ट्रने साजरा केला संविधान दिन

ठाणे : बॅंकिंग उद्योगात व समाजिक कार्यात अग्रेसर असलेली बॅंक ऑफ महाराष्‍ट्रच्‍या ठाणे क्षेत्राने ठाणे स्थित क्षेत्रीय कार्यालयात मोठया उत्‍साहात संविधान दिन साजरा केला. या प्रसंगी बॅंकेच्‍या ठाणे क्षेत्राचे उप क्षेत्रीय प्रबंधक, राजेंद्र बोरसे, रमेश सोनवणे, अमित सुतकर, नामदेव तळपडे व विपणन सदस्‍य, अरविंद मोरे व उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस बॅंकेचे उप क्षेत्रीय प्रबंधक, राजेंद्र बोरसे व उपस्थित मान्‍यवरांच्‍या शुभहस्‍ते हार व पुष्‍प अर्पन करुन झाली.

या प्रसंगी राजेंद्र बोरसे, उप क्षेत्रीय प्रबंधक म्‍हणाले की, आज प्रत्‍येक नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्‍याय, विचार, अभिव्‍यक्‍ती, विश्‍वास, श्रध्‍दा व उपासना यांचे स्‍वातंत्र्य प्राप्‍त झाले आहे. बोरसे म्‍हणाले की, जगातील सर्वात बलशाली घटना भारताची आहे हयाचा आपण सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

या प्रसंगी बॅंकेचे विपणन सदस्‍य अरविंद मोरे म्‍हणाले की, भारतीय घटनेचा केंद्र बिंदु हा सामान्‍य नागरीक आहे. यामुळे प्रत्‍येक नागरिकास त्‍याचे मुलभुत अधिकार प्राप्‍त झाले असून जनसामान्‍याचा विकास व्‍हावा हा मुख्‍य उद्देश घटनेचा आहे. अरविंद मोरे यांनी 26 नोव्‍हेंबर या दिनी आतंकवादी हल्‍ल्‍यात शहीद झालेल्‍या भारतीय शुरविरांना आदरांजली अर्पन केली व हा हल्‍ला त्‍या शुरविरांवर नसून हा आपल्‍या स्‍वातंत्र्यावर अर्थात घटनेवर असल्‍याचा व भाविष्‍यात असे होणार नाही यासाठी सजग राहण्‍याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नामदेव तळपडे यांनी केले तर घटनेचे प्रास्‍ताविकाचे वाचन अमित सुतकर यांनी केले. या प्रसंगी रमेश सोनवणे यांनी भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुपंर्ण घटना तयार करण्‍यास कसे परिश्रम घेतले याचा उहापोह केला.

कार्यक्रमास बॅंकेचे मुख्‍य प्रबंधक, शक्‍तीवेल, आयोजना अधिकारी, जितेंद्र मेंघानी, विपणन अधिकारी, पुष्‍पकर, बिना नाईक, मृणालिनी गजभे, शैला ठकेकर, अंजली ओक, सदानंद पेडणेकर, मधु जामदार, योगेश मोरे, दत्‍तु हलिंगे, मंगेश भालेराव, गोपिनाथ पानझडे, सतिश पारधे, प्रमोद चन्‍ने व शाखा प्रबंधक, अधिकारी व कर्मचारीवर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget