मंत्रिमंडळ बैठक निर्णय : 5 डिसेंबर 2017 : मलकापूर येथे दोन स्वतंत्र नियमित न्यायालये

मुंबई ( ५ डिसेंबर ) : मलकापूर (जि. बुलढाणा) येथे कार्यरत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोड न्यायालयांऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशी दोन स्वतंत्र न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्वतंत्र न्यायालयांमुळे या तालुक्यातील नागरिकांची सोय होणार असून न्यायप्रक्रिया गतिमान होणार आहे.

मलकापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांचे जोड न्यायालय ही दोन्ही न्यायालये 28 नोव्हेंबर 2009 पासून अस्तित्वात आहेत. बुलढाणा येथे नेमणूक असलेल्या न्यायाधिशांनाच स्वत:च्या कर्मचाऱ्यांसह मलकापूर येथे 15 दिवस जाऊन या जोडन्यायालयांचे कामकाज करावे लागत होते. ही जोडन्यायालये स्वतंत्र स्वरुपात कार्यरत करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्च न्यायालयाने मान्यता दर्शविली आहे. त्यानुसार मलकापूर येथे जोड न्यायालयाऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशी दोन स्वतंत्र न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करण्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच या न्यायालयांच्या कामकाजासाठी पदनिर्मिती करण्यासदेखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी 13 नियमित पदे तर दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांच्यासाठी 19 नियमित पदे अशी एकूण 32 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget