''माफी मागा'' नाही तर भीम आर्मी महापालिकेवर बदनामीचा दावा ठोकणार

मुंबई ( ११ डिसेंबर ) : महापालिका प्रशासनाने चैत्यभूमीचा परिसर चकाचक करीत ७० टन कचरा उचलला, अशी माहिती वृत्तपत्रांना दिली. यावर भीम आर्मीने आक्षेप घेतला आहे.

एका रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा उचलण्यात आला असेल तर, महापालिकेकडून संपूर्ण मुंबई एका रात्रीत का स्वच्छ होत नाही, असा प्रश्न भीम आर्मीचे महाराष्ट्र कोअर कमिटी प्रमुख राजू झनके यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेने खोटी माहिती जाहिर केल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेने जाहिर माफी मागावी, अन्यथा भीम आर्मी तर्फे महापालिकेवर बदनामीचा दावा ठोकला जाईल, असे त्यांनी ''मराठी १ नंबर बातम्या'' शी बोलताना सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायीं दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास येतात. यावेळी आंबेडकरी अनुयायींचा निळा महासागर येथे दिसून येतो.

यंदा ही लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी ६ डिसेंबर २०१७ रोजी चैत्यभूमीवर आले होते. पण मंगळवारी (५ डिसेंबर ) सांयकाळी शिवाजी पार्क येथे आंबेडकरी अनुयायींसाठी बांधण्यात आलेला मंडप कोसळला. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले. तरी कोणाशी वाद न घालत नेहमीप्रमाणे अनुयायीनी शांततापूर्ण वातावरणात आपल्या बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून परतले.

मात्र दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनाने चैत्यभुमीचा संपूर्ण परिसर चकाचक करीत ७० टन कचरा उचलल्याचे जाहीर केले. याबाबत ''महाराष्ट्र टाइम्स'' आणि ''लोकसत्ता'' वृत्तपत्रांनी बातम्या प्रकाशित केल्या. याचा जाहिर निषेध आंबेडकरी जनतेतर्फे केला जात आहे. आंबेडकरी अनुयायी केवळ चैत्यभुमीचा परिसर अस्वच्छ करण्यास येतात, असे या बातमीतून स्पष्ट होत असल्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, असे भीम आर्मीचे मुंबई प्रमुख एडवोकेट रत्नाकर डावरे यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाने चैत्यभूमीचा परिसर चकाचक करीत ७० टन कचरा उचलला, ही माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडूनच वृत्तपत्रांना देण्यात आली होती. त्यामुळे ७० टन कचरा उचलण्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती फोटो सहीत जाहिर करावी. याकरिता कोण ठेकेदार, किती कामगार होते, त्या कामगारांचे नाव आणि संपर्कसहित माहिती देण्यात यावी, तसेच महापरिनिर्वाण दिनी पालिका प्रशासनाकडून खर्च करण्यात आलेल्या करोडो रुपयांची सविस्तर माहिती ही जाहिर करावी, दरवर्षी एकाच ठेकेदाराला कंत्राट दिले जाते का, याची माहिती मिळण्यासाठी पालिका प्रशासनाने पाच वर्षांची माहिती जाहिर करावी, तसेच मंडप कोसळल्याने संबधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, शिवाजी पार्क परिसरातील स्टॉलचे पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पालिकेने द्यावी, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे, असे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सांगितले. 

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झालेला नसताना ही पालिकेने खोटी माहिती जाहिर केली आहे. त्यात कहर म्हणजे, एखाद्या सेलीब्रेटिनी हातात झाड़ू घेतली तर त्याचे फोटो सर्व वृत्तपत्रांना देण्याचे काम पालिकेचे जनसंपर्क विभाग करते. तर चैत्यभुमीचा परिसर स्वच्छ करण्याचे काम आंबेडकरी अनुयायीद्वारे करण्यात आले. याकरीता आंबेडकरी अनुयायीनी कुठल्याही मोबदला घेतला नाही. याबाबत पालिका प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने प्रेसनोट काढून वृत्तपत्रांना माहिती का दिली नाही, असा प्रश्न ही झनके यांनी उपस्थित केला.

याबाबत जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आम्हाला संबधित वार्ड कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही वृत्तपत्रांना ७० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती दिलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget