कमला मिल दुर्घटना : सहाय्यक आयुक्तांची तात्काळ बदली, तर ५ अधिकारी निलंबित

मुंबई, दि. २९ : बृहन्मुंबई महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभाग कार्यक्षेत्रातील 'कमला मिल कंपाऊंड' परिसरात दि. २९ डिसेंबर २०१७ च्या मध्यरात्री आगीची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांना दिले आहेत; असे निवेदन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज केले.

शिवाय, आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी आढळून आलेल्या 'जी दक्षिण' विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिश बडगिरे आणि सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी (ADFO) एस. एस. शिंदे या ५ अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची व सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचीही माहिती आयुक्त मेहता यांनी बैठकी दरम्यान दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget