(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दिव्यांगानाही मिळणार कौशल्ययुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण | मराठी १ नंबर बातम्या
" />

दिव्यांगानाही मिळणार कौशल्ययुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण

मुंबई ( २ डिसेंबर ) : राज्यातील दिव्यांगानाही त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) ने मान्यता दिलेल्या कौशल्ययुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल असे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमध्ये यासाठी एक कक्ष या उपक्रमाची जबाबदारी हाताळणार आहे.

विशेष म्हणजे असे प्रशिक्षण देताना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) ने मान्यता दिलेल्या NSQF च्या स्तराशी सुसंगत असणारे विविध कौशल्ययुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (MSCVT) यांची मान्यता देण्यात येणार आहे.

दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याकरीता सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या विशेष शाळांना कौशल्य प्रशिक्षण संस्था म्हणून सूचिबध्द करण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवार हे या विशेष शाळांमध्ये अथवा नजिकच्या महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (MSCVT) यांचेकडे सूचिबध्द असलेल्या कौशल्य प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या मागणीनुसार कौशल्य प्रशिक्षण घेऊ शकणार असून यासाठी आवश्यक असल्यास त्यांच्या वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

दिव्यांगांच्या 21 संवर्गातील दिव्यांग (जसे की, अस्थिव्यंग) हे दिव्यांग नसलेल्या युवक-युवतीं प्रमाणे कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम असल्यास, त्यांना प्रथम प्राधान्याने त्यांच्या मागणीनुसार कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधून कौशल्ययुक्त अभ्यासक्रमांच्या नियमित तुकडयांमध्ये प्रवेश देण्यात येईल. दिव्यांग उमेदवारांना त्यांचेकरीता लागू असलेल्या भाषांमध्ये शिकविण्याकरीता (उदा. ब्रेल लिपी) दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील ‍शिक्षक/कर्मचारी यांना प्रशिक्षण देवून त्यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तिंना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget