अरबी समुद्रातील ओखी चक्रीवादळाचा धोका

4 आणि 5 डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये!

मुंबई ( २ डिसेंबर ) : अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, ते सध्या मुंबईच्या समुद्रालगत दक्षिणेकडे 1000 कि.मी वर स्थित आहे. 6 डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांवरील समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईसह सागरी किनाऱ्यांवर 4 तारखेला अंशत: तसेच 5 तारखेला पावसाचीही स्थिती राहू शकते. 5 तारखेला मुंबई, कोकणात सागरी भागात वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क असावे. यामुळे किमान तापमानात वाढ होईल आणि थंडी काही प्रमाणात कमी होईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget