व्यवसायांकरिता वापरण्यात येणा-या विविध इंधनानुसार अग्निसुरक्षा अंमलबजावणी बंधनकारक

अग्निसुरक्षा विषयक अंमलबजावणीसाठी 'अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष'

अग्निसुरक्षा विषयक बाबींची एका महिन्यात अंमलबजावणी करणे आवश्यक

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध व्यवसायांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने एल.पी.जी. सिलिंडर, पाईप्ड नॅचरल गॅस, विद्युत उपकरणे, रॉकेल, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड या सारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. या इंधन प्रकारानुसार संबंधितांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत (Fire Codified Requirements) याची मुद्देसूद माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यानुसार आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत अथवा नाही? याची तपासणी करण्यासाठी अग्निशमन केंद्र निहाय प्रत्येकी एक याप्रमाणे ३४ 'अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष' सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तथापि, 'फायर कोडीफाईड रिक्वायरमेंट' नुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी संबंधितांना एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

साकीनाका परिसरात घडलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका मुख्यालयातील महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. 'महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियम २००६' च्या अनुषंगाने अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विविध ठिकाणी अग्निसुरक्षा विषयक तपासणीच्या अनुषंगाने ३४ 'अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) राम धस, उपायुक्त (अतिक्रमणे निर्मूलने) निधी चौधरी यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अग्निसुरक्षा विषयक बाबींची अंमलबजावणी करताना 'फायर कोडीफाईड रिक्वायरमेंट' नुसार काय काळजी घ्यावी? याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये एल.पी.जी. सिलिंडर, पाईप्ड नॅचरल गॅस, विद्युत उपकरणे, रॉकेल, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड या सारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर व्यवसायासाठी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

या अंतर्गत एल.पी.जी. या इंधन प्रकाराचा अन्न शिजविण्यासाठी वापर करताना एक गॅस सिलेंडर असल्यास घ्यावयाची काळजी, दोन गॅस सिलेंडर असल्यास घ्यावयाची खबरदारी; तर २ पेक्षा अधिक गॅस सिलेंडर वापरणा-यांनी सुरक्षा विषयक काय अंमलबजावणी करावी? याची मुद्देसूद माहिती उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. याच प्रमाणे पाईप्ड नॅचरल गॅस, विद्युत उपकरणे, रॉकेल, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड या सारख्या विविध इंधन प्रकारानुसार काय काळजी घ्यावी, याचीही माहिती सुनिश्चित कार्यपद्धतीमध्ये देण्यात आली आहे. या 'फायर कोडीफाईड रिक्वायरमेंट' नुसार आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करवून घेण्यासाठी संबंधित व्यवसायिकांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधी नंतर ज्या ठिकाणी अंमलबजावणी झाली नसेल, त्याबाबत संबंधितांविरुद्ध 'महाराष्ट्र फायर प्रीव्हेंशन व लाईफ सेफ्टी
मेझर्स ऍक्ट' अंतर्गत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याद्वारे संबंधित जागा बंद (Seal) करणे, सदर जागेचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच सदर धोकादायक व्यवसाय बंद
करण्याविषयीची कारवाई 'बृहन्मुंबई महापालिका अधिनियम' व 'महाराष्ट्र स्लम ऍक्ट' यानुसार सहाय्यक आयुक्तांद्वारे केली जाईल.

या 'फायर कोडीफाईड रिक्वायरमेंट' नुसार अंमलबजावणी करण्यात आली आहे अथवा नाही? याची नियमितपणे तपासणी करणारी स्वतंत्र यंत्रणा महापालिकेच्या स्तरावर कार्यरत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन आता अग्निसुरक्षा विषयक बाबींची नियमितपणे तपासणी करण्यासाठी 'अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष'
सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कक्षांचे प्रशासकीय नियंत्रण हे संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे (वॉर्ड ऑफीसर) असणार आहे. तथापि, या कक्षांच्या तांत्रिक बाबींचे नियंत्रण हे प्रमुख अग्निशमन
अधिकारी यांच्याकडे असणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget