5 हजार 2 शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्याच शाळेत करण्यात येणार

मुंबई ( २ डिसेंबर ) : विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान राज्य शासनाला करावयाचे नाही आणि त्यामुळेच दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 5 हजार 2 शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले आहे.

कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील एकूण शाळांपैकी 5,002 शाळांमधील मुलांची पटसंख्या 0 ते 10 या दरम्यान आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात येत नसून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जवळच्याच शाळेत कसे समायोजन करण्यात येत आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शिक्षण मंत्री यांनी समायोजन करताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे महत्वाचे असून शिक्षकांच्या नोकरी किंवा बदलीचा प्रश्न उद्भवत नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आज अशा अनेक शाळा डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत जेथे विद्यार्थी संख्या शून्य असली तरी शाळा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.

यावेळी तावडे म्हणाले की, एकूण 5 हजार 2 शाळांपैकी 4 हजार 353 शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. या जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 8 हजार 72 शिक्षक आहेत. खाजगी अनुदानित शाळा 69 आहेत. खाजगी अनुदानित शाळांमध्ये 220 शिक्षक आहेत. अशा एकूण शून्य ते 10 पटसंख्या असलेल्या एकुण 4 हजार 422 शाळा आहेत. 4 हजार 422 शाळांमधून 28 हजार 412 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उर्वरीत 580 शाळा या आदिवासी, विना अनुदानित, सामाजिक न्याय, स्वयंअर्थसहाय्यित या प्रकारात मोडतात. तर 2 हजार 97 शाळांचे स्थलांतर होऊ शकते, मात्र त्यांना वाहनांची सोय उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सर्वेक्षणादरम्यान 909 शाळा स्थलांतरित कराता येणार नाही असे लक्षात आल्याने या शाळा बंद करण्यात येणार नाहीत.

कमी गुणवत्तेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ठेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान शालेय शिक्षण विभागाला करायचे नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 314 शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येत असल्याचे तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

1 हजार 314 शाळांची वर्गनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे.

मुंबई विभाग : मुंबई उपनगर –1, ठाणे – 45, पालघर – 32, रायगड – 103

नाशिक विभाग :जळगाव -8, धुळे – 7, नंदुरबार -5, नाशिक -31

पुणे विभाग : पुणे -76, सोलापूर -21, अहमदनगर - 49

कोल्हापूर विभाग : कोल्हापूर -34, रत्नागिरी -192, सांगली – 16, सातारा -73, सिंधुदुर्ग – 155

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद -40,जालना -6, परभणी – 14, बीड -23, हिंगोली -4

लातूर विभाग : लातूर- 8, उस्मानाबाद – 7, नांदेड – 68

अमरावती विभाग : अमरावती – 49, अकोला – 18, वाशिम -9, यवतमाळ -30, बुलढाणा – 8

नागपूर विभाग : नागपूर -24, वर्धा -29, भंडारा -12, गोंदिया- 32, चंद्रपूर -53, गडचिरोली -42
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget