‘मराठी चित्रपट महोत्‍सव’ रशियामध्‍ये आयोजित करावा – अॅड्री झिलोत्‍सव्‍ह

मुंबई ( ११ डिसेंबर ) : मुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग (रशिया) या दोन भगिनी शहरांचे संबंध ५० वर्षात घट्ट निर्माण झाले असून आगामी काळात शिक्षण, व्‍यापार आणि सांस्‍कृतिक क्षेत्रातील आदानप्रदानव्‍दारे ते आणखी वृंध्‍दीगत करण्‍यावर भर देणार असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.

मुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग या दोन शहरांच्‍या भगिंनी शहर संबंधाना ५० वर्ष पूर्ण झाल्‍यानिमित्त बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या वतीने सेंट पिटर्सबर्गच्‍या पाहुण्‍यांसाठी तीन दिवसीय सांस्‍कृतिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असून या कार्यक्रमाचा शुभारंभ काल (दिनांक १० डिसेंबर, २०१७) रात्री नरीमन पॉईन्‍ट येथील हॉटेल ट्रायडेन्‍टमध्‍ये करण्‍यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सेंट पिटर्सबर्ग शहराच्‍या अर्थ विभागाच्‍या प्रमुख ईलिना फेडोरोव्‍हा, रशियाचे मुंबईतील वाणिज्‍य दूत अॅड्री झिलोत्‍सव्‍ह, सेंट पिटर्सबर्ग शहराच्‍या शिक्षण विभागाच्‍या प्रमुख एकतरिना स्‍टेपनोव्‍हा, सेंट पिटर्सबर्ग शहराचे आंतरराष्‍ट्रीय संबंधांचे प्रमुख अलेक्‍सी वोरनको, विरोधी पक्षनेते रवि राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए.एल. जऱहाड, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, बाजार व उद्यान समिती अध्‍यक्षा सान्‍वी तांडेल, महिला व बाल कल्‍याण समिती अध्‍यक्षा सिंधू मसुरकर, उप आयुक्त (परिमंडळ -१ ) सुहास करवंदे हे मान्‍यवर उपस्थित होते.

महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना पुढे म्‍हणाले की, भारतातील विद्यार्थ्‍यांचा भर हा रशियामध्‍ये वैद्यकीय शिक्षण घेण्‍यावर जास्‍त असून भविष्‍यकाळात दोन शहरांमध्‍ये वेगवेगळया क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होणे आवश्‍यक असल्‍याचे महापौरांनी सांगितले. त्‍यासोबतच रशियन भाषा मुंबईकर नागरिकांना शिकता येण्‍यासाठी रशियन भाषेचे प्रशिक्षण केंद्र मुंबईत सुरु करण्‍याची ईच्छा महापौरांनी
यावेळी व्‍यक्‍त केली.त्‍याचप्रमाणे मुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग हे दोन शहरे समुद्रकिनाऱयावर वसलेली असल्‍यामुळे दोन शहरांच्‍या समस्‍यादेखील सारख्‍याच असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. वातावरणात होणार बदलाबाबत दोन शहरांनी मिळून काही अद्ययावत तंत्रज्ञान जगाला देता आले तर त्‍याचा निश्चित विचार करावा अशी सूचना महापौरांनी शेवटी केली.

रशियाचे मुंबईतील वाणिज्‍य दूत अॅड्री झिलोत्‍सव्‍ह यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, भारतीय चित्रपटाचे चाहते रशियात मोठया प्रमाणावर असून हिंदी भाषेचा चित्रपट महोत्‍सव रशियात आयोजित करण्‍यात देखील येतो, परंतु मराठी भाषेचा चित्रपट महोत्‍सव रशियात अद्यापपर्यंतही आयोजित करण्‍यात आला नसून बृहन्‍मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन मराठी चित्रपट महोत्‍सव रशियात आयोजित करावा अशी सूचनाही त्‍यांनी यावेळी केली. बृहन्‍मुंबई महापालिकेने चांगला सांस्‍कृतिक कार्यक्रम आयोजित केल्‍याबद्दल त्‍यांनी महापालिकेचे कौतुक केले.

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, मुंबई शहर हे भारताचे मोठे औद्योगिक केंद्र असून भविष्‍यकाळातील पाण्‍याची गरज लक्षात घेता पाण्‍याचा पुर्नवापर करण्‍याबाबतच्‍या तंत्रज्ञानावर आपण चर्चा घडवून आणावी अशी सूचना त्‍यांनी यावेळी केली.

अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (शहर) ए.एल. जऱहाड यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, मुंबई आणि सेंट पिटर्सबर्ग या दोन शहरांच्‍या भगिंनी शहर संबंधाना ५० वर्ष पूर्ण झाल्‍यानिमित्त सेंट पिटर्सबर्गच्‍या
पाहुण्‍याचे महापालिका प्रशासनाचे वतीने स्‍वागत करीत असल्‍याचे ते म्‍हणाले. तसेच तीन दिवसीय कार्यक्रमात आपण शिक्षण, संस्‍कृती, पाण्‍याचा पुर्नवापर यावर अधिक सविस्‍तर चर्चा करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी भारतीय संस्‍कृतीचे दर्शन भारतीय सांस्‍कृतिक कार्यक्रमातून तसेच रशियन संस्‍कृतीचे दर्शन रशियन सांस्‍कृतिक कार्यक्रमाच्‍या सादरीकरणातून करण्‍यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget