व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धा

मुंबई ( 12 डिसेंबर ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘बालचित्रकला स्पर्धा २०१७-१८’ चे आयोजन दिनांक १४ जानेवारी, २०१८ रोजी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उद्याने व मैदाने येथे आयोजित करण्यात आली आहेत. या स्पर्धेत चार गट करण्यात आले आहेत. तर या बालचित्रकला स्पर्धेत अनुदानित विना-अनुदानित शाळांतील लाखो विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे बालचित्रकला स्पर्धा मागील ७ वर्षांपासून आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात. मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक १२ डिसेंबर, २०१७) महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस उप महापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्‍यक्ष अनंत नर, बाजार व उद्यान समितीच्‍या अध्‍यक्षा सान्‍वी तांडेल, उप आयुक्‍त डॉ. किशोर क्षीरसागर, सहाय्यक आयुक्‍त देवेंद्रकुमार जैन, अलका ससाणे, शिक्षणाधिकारी महेश पालकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी सांगितले की, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बालचित्रकला स्पर्धा २०१७-१८ चे नियोजन
प्रतिवर्षाप्रमाणे सुसज्ज व दर्जेदार करण्यात यावे. स्पर्धा आयोजित करण्यात येणारी उद्याने / मैदाने येथे स्वच्छतेसह विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

तसेच सन २०१७-१८ मध्‍ये गट क्रमांक १ - इयत्ता १ ली ते २ री, गट क्रमांक २ - इयत्ता ३ री ते ५ वी, गट क्रमांक ३ - इयत्ता ६ वी ते ८ वी आणि गट क्रमांक ४ - इयत्ता ९ वी ते १० वी असा गट करण्यास महापौरांनी प्रशासनास
निर्देश दिले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विभाग स्तरांवर उत्तम चित्र काढल्याबद्दलही विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

‘माझी मुंबई’ या विषयांवर आधारित ही बालचित्रकला स्पर्धा असल्याने गटनिहाय विषय लवकरच निश्चित केले जाईल, असे महापौरांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget