वेध ६३ वी राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धा मुंबईत सुरू

मुंबई, दि. २७ - महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने राज्यात तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत २०१७ - १८ या वर्षात १७ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी ‘वेध ६३ वी राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धा’ ३० डिसेंबर 2017 पर्यंत मुंबईत सुरू राहणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत देशातील अंदाजे ३१ राज्यातून १७ वर्षे वयोगटातील सुमारे ५५० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाबाबतचे वातावरण तयार होऊन चांगले खेळाडू घडावेत आणि नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश असल्याचे क्रीडा व युवकसेवा मुंबई विभागाचे एन.बी.
मोटे सांगितले. ही स्पर्धा मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, मुंबई पोलीस जिमखाना, पी.जे.हिंदु जिमखाना, पारसी जिमखाना, सचिवालय जिमखाना येथे सुरू आहेत. मुंबई शहराचा दैदिप्यमान पुर्व इतिहास लक्षात घेता या स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट झाले असून, क्रिकेट रसिकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. स्पर्धेतील विद्यार्थी महाराष्ट्राचा नावलौकिक देशभर पोहोचवतील असा विश्वास मोटे यांनी व्यक्त केला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget