चेंबुरमधील ‘ त्‍या’ पीडित मुलांची महापौरांनी घेतली भेट

मुंबई दि. १६ : गत तीन दिवसापूर्वी झाड कोसळून मृत्‍युमुखी पडलेल्‍या शारदा घोडेस्‍वार यांच्‍या चेंबुर येथील घरी मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज ( दिनांक १६ डिसेंबर २०१७) भेट देऊन त्‍यांच्‍या मुलांचे सांत्‍वन केले तसेच त्‍यांना वैयक्तिकरित्‍या आर्थ‍िक मदत केली.

यावेळी स्‍थानिक आमदार तुकाराम काते, सुधार समिती अध्‍यक्ष अनंत नर, स्‍थानिक नगरसेविका समृध्‍दी काते, एम /पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्‍त हर्षद काळे उपस्थ‍ित होते .

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे मिळणारी एक लाख रुपयांची मदत ही तुंटपुंजी असून मोठया मुलाला महापालिकेच्‍या सेवेत सामावून घेण्‍याची मागणी स्‍थानिक नागरिकांनी महापौरांकडे यावेळी केली. याबाबत
गटनेत्‍यांच्‍या बैठकीत सर्वपक्षीय नेत्‍यांसोबत चर्चा करुन योग्‍य तो निर्णय घेणार असल्‍याचे महापौरांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे धोकादायक झाडांबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्‍यास तातडीने संबधित
अधिकाऱयांनी त्‍याठिकाणी जाऊन पाहणी करावी व तात्‍काळ योग्‍य तो निर्णय घ्‍यावा, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱयांना केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget