प्रभाग क्र. २१च्‍या पोटनिवडणूकीत भाजपच्‍या प्रतिभा गिरकर विजयी

मुंबई दि. 14 : कांदिवली (पश्चिम) प्रभाग क्र. २१ भाजप पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका शैलजा गिरकर यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर दिनांक १३ डिसेंबर २०१७ झालेल्‍या पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्‍या प्रतिभा योगेश गिरकर यांनी ०९ हजार ५९१ मते पटकावून विजय संपादन केला.
त्‍यांनी भारतीय राष्‍ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्‍या निलम विशाल मधाळे (मकवाणा) यांचा ७ हजार ६०७ मतांनी पराभव केला. भारतीय राष्‍ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्‍या निलम विशाल मधाळे (मकवाणा) यांना ०१ हजार ९८४
मते मिळाली. एकूण २२९ मतदारांनी मतदानाचा नकाराधिकार (नोटाचा) वापर केला. सदर पोटनिवडणूकीची आज (दि. १४ डिसेंबर २०१७) मतमोजणी करण्‍यात आली.

या निवडणूकीसाठी ६ हजार ६३१ पुरुष व ०५ हजार १७३ स्त्रिया‍‍ असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजाविला होता. उपजिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय सरोदे यांच्‍या
मार्गदर्शनाखाली पोटनिवडणूकीची मतमोजणी कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget