हिंदी निम्नस्तर आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अमराठी भाषिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आपली आवेदनपत्रे विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयांकडे दि. 30 डिसेंबर 2017 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

मुंबई व कोकण विभागातील अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400614, दूरध्वनी क्र.022-27573542 येथे पाठविता येतील. पुणे व नाशिक विभागात राहणाऱ्यांना या परीक्षेसाठीचे अर्ज विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411001, दूरध्वनी क्र. 020-26121709 येथे करता येईल. तर नागपूर व अमरावती विभागात राहणारे विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001, दूरध्वनी क्र. 0712-2564956 येथे तर औरंगाबाद विभागासाठी विभागीय सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दूरध्वनी क्र. 0240-2361372 येथे अर्ज करता येतील.

हिंदी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षेसंबंधात अधिक माहिती आवश्यक असल्यास उपरोक्त संबंधित विभागीय सहायक भाषा संचालक यांच्याशी किंवा भाषा संचालक यांच्याशी दूरध्वनी क्र. 022- 26552184 वर संपर्क साधावा असे आवाहन भाषा संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget