डॉ श्रीनिवास वरखेडी यांची कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

मुंबई, दि.13 : राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी डॉ श्रीनिवास वरखेडी यांची रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.

डॉ वरखेडी सध्या बंगलुरू येथील कर्नाटक संस्कृत विदयापीठामध्ये प्राध्यापक तथा डीन पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

डॉ उमा वैद्य यांचा कार्यकाळ दिनांक १८ सप्टेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

डॉ श्रीनिवास वरखेडी यांनी बंगलोर विद्यापीठातून संस्कृत विषयात एम.ए. ही पदवी प्राप्त केली असून दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थान येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे.

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ वरखेडी यांच्या नावाची घोषणा केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget