मुंबई शहरातील हुक्‍का पार्लर कायमस्‍वरुपी बंद करा – महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर

महापौरांनी घेतली मुंबई पोलिस आयुक्‍तांची भेट

मुंबई, दि. २७ : मुंबई शहर आणि उपनगरामध्‍ये मोठ्या प्रमाणावर हुक्‍का पार्लर्स सुरु असून, हुक्‍का पार्लरमध्‍ये मादक पदार्थांचे सेवन आजची तरुण पिढी सर्रासपणे करीत आहे. तेव्‍हा या हुक्‍का पार्लरवर त्‍वरित बंदी आणावी, अशी मागणी मुंबईचे महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली. आज (दिनांक २७ डिसेंबर, २०१७) मुंबईचे पोलिस आयुक्‍त दत्ता पडसलगीकर यांची महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पोलिस आयुक्‍त कार्यालय येथे भेट घेतली.

महापौरांनी दिलेल्‍या आपल्‍या निवेदनात नमूद केले आहे की, गुन्‍हेगारी क्षेत्रातील गुन्‍हेगार आणि समाजकंटकाचा सर्रास वावर या हुक्‍का पार्लरमध्‍ये होत आहे. दुर्दैवाची बाब म्‍हणजे आजची तरुण पिढी या हुक्‍का पार्लरकडे आकर्षित झालेली आहे, ही समाजस्‍वास्‍थाच्‍या दृष्‍टीने गंभीर बाब आहे.

मादक पदार्थांचे सेवन केल्‍यानंतर स्‍वतःवरचे नियंत्रण घालवून बसलेल्‍या आजच्‍या तरुणाईकडून मारामाऱया, खून असे प्रकार केले जात आहेत. नुकत्‍याच गोरेगांव याठिकाणी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्‍याचा खून
हुक्‍का पार्लरमध्‍ये झाला, याचा उल्‍लेख महापौरांच्‍या निवेदनात केला आहे. उत्‍पादनावर बंदी असूनही आजही ही उत्‍पादने राजरोसपणे विकली जातात आणि याची जास्‍तीत-जास्‍त विक्री ही महाविद्यालय व शाळा परिसरामध्‍ये होताना आढळते.

तेव्‍हा सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्‍न लक्षात घेता, महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणा यांच्‍या समन्‍वयाने सर्व हुक्‍का पार्लर्सवर प्रतिबंध घालणे अत्‍यंत आवश्‍यक असल्‍याचे महापौरांनी नमूद केले. आपली भावी पिढी सुमार्गाला लागावी, या दृष्‍टीने ठोस कार्यवाही करावे, असेही आवाहन महापौरांनी पोलिस आयुक्‍तांना केले आहे. यावेळी शाखा प्रमुख श्री. नितीन डिचोलकर हे उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget