जास्‍तीत-जास्‍त मुंबईकरांनी ‘स्‍वच्‍छता ऍप’ डाऊनलोड करावे – महापालिकेचे आवाहन

मुंबई : मुंबई शहराची सर्वांगीण स्‍वच्‍छता ठेवण्‍याची महत्‍वपूर्ण जबाबदारी बृहन्‍मुंबई महापालिका समर्थपणे पार पाडीत असून यापुढेही सर्वांगीण स्‍वच्‍छता मोहिमेत मुंबईकर नागरिकांचा उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग असावा म्‍हणून केंद्र शासनाने निर्धारित केलेला ‘स्‍वच्‍छता ऍप’ डाऊनलोड करुन मुंबई शहराच्‍या सर्वांगीण स्‍वच्‍छतेस मुंबईकर नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहनही बृहन्‍मुंबई महापालिकेतर्फे करण्‍यात आले आहे.

GOOGLE PLAY STORE / APPLE APP STORE वरुन “Swachhata-MoHUA App” डाऊनलोड करा. हे ‘स्‍वच्‍छता ऍप’ डाऊनलोड झाल्‍यानंतर नागरिकांना ज्‍या-ज्‍या ठिकाणी अस्‍वच्‍छता आढळल्‍यास तेथील फोटो काढून महापालिकेकडे ह्या ‘स्‍वच्‍छता ऍप’द्वारे पाठविल्‍यास पालिकेकडून त्‍वरित स्‍वच्‍छतेबाबतची कार्यवाही करण्‍यात येईल.

याबाबत नागरिकांमध्‍ये मोठय़ा प्रमाणात प्रबोधन व्‍हावे म्‍हणून टीव्‍ही चॅनलवरील सुप्रसिद्ध कलाकार श्रीमती श्रुती मराठे व श्री. गौरव घाटणेकर यांनी ‘स्‍वच्‍छता ऍप’ मुंबईकर नागरिकांनी डाऊनलोड करण्‍याचे आवाहन एका चित्रफ‍ितीद्वारे केले आहे. त्‍यासोबतच फ‍िनिक्‍स मॉल - लोअर परळ, इन ऑरब‍िट मॉल - मालाड, सिटी मॉल - घाटकोपर, ओबेरॉय मॉल - दिंडोशी या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पथनाटय़ाद्वारे स्‍वच्‍छतेबाबत मुंबईकर नागरिकांमध्‍ये प्रबोधन करणार आहेत. 

तरी मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्‍यात येत आहे की, त्‍यांनी आपापल्‍या मोबाईलमध्‍ये सदर ‘स्‍वच्‍छता ऍप’ डाऊनलोड करावे तसेच आपल्‍या कुटुंबियांना आणि शेजाऱयांनाही याबाबत प्रबोधन करुन मुंबई शहर भारतातील सर्वांत ‘स्‍वच्‍छ शहर’ करण्‍याच्‍या कामी मोलाचे सहकार्य करावे. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget