एप्रिल २०१८ पासून होणार नालेसफाई कामांना सुरुवात

मुंबई : पावसाळा सुरु होण्यास अद्याप काही महिन्यांचा कालावधी बाकी असला, तरी पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत करावयाच्या नालेसफाई कामांशी संबंधित प्रशासकीय कार्यवाहीने आता वेग घेतला आहे. मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदीच्या सफाई कामांची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. याबाबत पर्जन्य जल वाहिन्या खात्याद्वारे (Storm Water Drainage) देण्यात आलेल्या माहितीनुसार मोठ्या नाल्यांसाठी २६, छोट्या नाल्यांसाठी १८ तर मिठी नदीसाठी ४ निविदा; यानुसार एकूण ४८ निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणारी नालेसफाईची कामे ही एप्रिल ते मार्च या वर्षभराच्या कालावधीत केली जातात. या कामांपैकी ६० टक्के कामे ही पावसाळ्यापूर्वी केली जातात. तर २० टक्के कामे ही पावसाळ्यादरम्यान आणि २० टक्के पावसाळ्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीत करण्याची दर वर्षीची पद्धत आहे, अशी माहिती पर्जन्य जल वाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता श्री. विद्याधर खंडकर यांनी दिली आहे.

महापालिका क्षेत्रातील 'शहर' भागातील नालेसफाईसाठी ७ निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये ३ निविदा या मोठ्या नाल्यांशी संबंधित आहेत. तर उर्वरित ३ छोट्या नाल्यांशी व १ मिठी नदीशी संबंधित आहे. पूर्व उपनगरांमधील नाले सफाई कामांसाठी १४ निविदा मागविण्यात आल्या असून यापैकी ६ निविदा या मोठ्या नाल्यांशी, ६ छोट्या नाल्यांशी आणि २ मिठी नदीशी संबंधित आहेत. तसेच पश्चिम उपनगरांमधील नालेसफाई कामांसाठी २७ निविदा असून यापैकी १७ निविदा मोठ्या नाल्यांच्या सफाईबाबत आहेत. तर उर्वरित पैकी ९ निविदा या छोट्या नाल्यांशी आणि एक निविदा पश्चिम उपनगरातील मिठी नदीशी संबंधित आहे.

वरीलनुसार मोठ्या नाल्यांच्या सफाई कामांसाठी २६ निविदा, छोट्या नाल्यांच्या सफाई कामांसाठी १८ निविदा; तर मिठी नदीच्या सफाई कामांसाठी ४ निविदांची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. यानुसार एकूण ४८ निविदांची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे, अशीही माहिती विद्याधर खंडकर यांनी दिली आहे.

प्रशासकीय कार्यवाही अंतिम टप्प्यात असणा-या संबंधित ४८ निविदांबाबंत संक्षिप्त आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

↓ भाग 
मोठे नाले
छोटे नाले
मिठी नदी
(भाग)
एकूण
शहर
3
3
1
7
पूर्व उपनगरे
6
6
2
14
पश्चिम उपनगरे
17
9
1
27
एकूण 
26
18
4
48


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मोठे नालेछोटे नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी ही सुमारे ६८९ किलोमीटर एवढी आहेमहापालिका क्षेत्रातील मोठ नालेछोटे नाले आणि नदी यांच्या लांबीबाबत संख्यात्मक तपशिल खालीलप्रमाणे आहे:

नाल्यांचा प्रकार

↓ भाग 
मोठे नाले

लांबी (कि.मी.)
छोटे नाले

लांबी (कि.मी.)
मिठी नदी

लांबी (कि.मी.)
एकूण

लांबी (कि.मी.)
शहर
17.135
29.64
6.25
53.025
पूर्व उपनगरे
90.00
250.377
11.805
352.182
पश्चिम उपनगरे
140.71
141.345
2.20
284.255
एकूण 
247.845
421.362
20.255
689.462

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget