डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी बांधण्यात आलेला मंडप कोसळला

मुंबई ( ५ डिसेंबर ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारत देशभरातून आंबेडकरी अनुयांयी दादर येथील चैत्यभुमीवर येतात. मुंबई महापालिका प्रशासन अनुयांयाची निवार्‍याची आणि अन्य सोयी सुविधा शिवाजी पार्कवर मैदानावर करते. यावेळी ही महापालिका प्रशासनाने अनुयांयाच्या निवार्‍यासाठी शिवाजी पार्क मैदानात मंडप उभारला होता. मंगळवारी सांयकाळी हाच मंडप अचानक कोसळला. या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले.

यमुनाबाई खंडारे ( ४० ) , महादेव खंडारे ( ५५ ) आणि निलेश भंडारी ( २८ ) हे जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांना जास्त दुखापत झालेली नाही. सर्वांची प्रकृती ठिक असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, दुर्घटनेनंतर शिवाजी पार्क मैदानात उपस्थित आंबेडकरी अनुयायी संतापले.

प्राशसनाचा गलथान कारभार

वादळ येणार आहे, हे जर प्रशासनाला आठवडाभरापूर्वी माहीत होते तर त्याप्रमाणे त्यांनी मंडपावर प्लास्टिक ताडपत्र वा पावसाळी दृष्टिकोनातून काळजी घेणे आवश्यक होते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच मंडप कोसळला आहे. यातून प्रशासनाच्या व्यवस्थापनातील गलथान कारभार दिसून येतो.
- आनंदराज आंबेडकर ( रिपब्लिकन सेना प्रमुख )

वादळ येणार याची माहिती मिळाल्यानंतर आदल्याच दिवशी आम्ही शिवाजी पार्क मधील कित्येक लोकांना आसपासच्या शाळेत हलविले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण जर प्रशासनाला वादळ येणार आहे, हे जर आठवडाभरापूर्वी पालिका प्रशासनाला माहीत होते तर मंडपावर प्लास्टिक ताडपत्र टाकणे वा पावसाळी दृष्टिकोनातून काळजी घेणे आवश्यक होती.
- गौतम सोनावणे ( मुंबई अध्यक्ष - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) )

मंडप कोसळणे ही फार गंभीर दुर्घटना आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल प्राशसाने घेतली पाहिजे. संबधित ठेकेदार आणि संबधित दोषींवर कारवाई करावी. कारण भविष्यात असा गलथानपणा होता कामा नये.
- नितीन सरदेसाई ( नेते - महाराष्ट्र नव निर्माण सेना )


 मंडप अचानक कोसळला ( live video )

https://www.facebook.com/marathieknumberbatmya/videos/945217255642369/

https://www.facebook.com/marathieknumberbatmya/videos/945219915642103/


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget