भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचे परिणामात्मक मुल्यांकन करणार

मुंबई, दि. 27 : राज्यातील सर्व भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांचे परिणामात्मक मुल्यांकन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम 1998 कलम 72 (1) नुसार ही प्रक्रिया
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत परिणामात्मक मुल्यांकनाची प्रक्रिया राबविण्यात येईल. महाविद्यालयाच्या मुल्यांकनासाठी तपासणी समिती गठीत करणे तपासणीचे विवरण पत्र अंतिम करणे, विद्यार्थ्यांची नमुना चाचणी, रूग्णालयांचा दर्जा तपासणे यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास प्राधिकृत करण्यात येत आहे. अशी माहिती वैद्यकिय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने एका परिपत्रकाद्वारे कळविली आहे.

महाराष्ट्र राज्यात वैद्यकिय शिक्षण देण्यासाठी वैद्यकिय, दंत, आयुर्वेद, होमीओपेथी, युनानी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, बी.एस्सी. (नर्सिंग) पी.बी.बी.एस्सी., बी.एस्सी. (ऑप्टोमेट्री) इत्यादी पदवी व आर.ए.एन.एम.,
आर.जी.एन.एम. इत्यादी पदविका अभ्यासक्रमांची महाविद्यालये कार्यरत आहेत. या महाविद्यालयांमध्ये संबंधित केंद्रीय राज्य परिषदेच्या मानकांनुसार आवश्यक असणा-या पायाभुत सुविधा, अर्हता प्राप्त प्राध्यापक, रूग्णालयीन सुविधा याबाबी सुयोग्य दर्जाच्या असणे अपेक्षित आहे.

यातुनच या महाविद्यालयातील शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा निश्चीत होत असतो. राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार असणे अपेक्षित आहे. या उद्देशाने सर्व महाविद्यालयीन व्यवस्थेचे सर्वंकष परिणामात्मक मुल्यांकन (Impact Assessment) करण्यात येत आहे. केंद्रीय स्तरावर भौतिकोपचार अभ्यासक्रमासाठी परिषद अस्तित्वात नाही. सद्यस्थितीत भौतिकोपचार महाविद्यालय सुरू करण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठाचे मानके आहेत. राज्यातील सर्वभौतीकोपचार महाविद्यालयांच्या दर्जाबाबत तपासणी करण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget