कमला मिल आग प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दुर्घटनास्थळास मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट

मुंबई, दि. २९ : कमला मिल कंपाऊंड परीसरातील आगीच्या दुर्घटनास्थळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश तसेच अशा परवानगी दिलेल्या ठिकाणांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजोस आणि वन अबव्ह या मनोरंजन गृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत चौदा जणांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांना सखोल चौकशीचे व दोषींवर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

या दुर्घटनास्थळास प्रत्यक्ष भेट देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती घेतली. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. मुंबई महापालिका आयुक्तांना या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीनंतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. मनोरंजन गृह चालक दोषी आढळल्यास त्यांच्यावरही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाईल. परवानगी दिलेल्या मनोरंजन गृहासारख्या ठिकाणांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अनधिकृत ठिकाणांवर कारवाईचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‌ दुर्घटनास्थळावर उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

कमला मिल कम्पाउंड आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

भीषण आगीत झालेल्या जीवहानीबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या निरपराध व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. आगीत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकर आराम पडो, अशी प्रार्थना करीत आहे,” असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget