‘वंदे मातरम’ने विधानपरिषदेच्या कामकाजास प्रारंभ

नागपूर ( ११ डिसेंबर ) : विधानपरिषदेत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. याप्रसंगी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सभागृह नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, शिक्षणमंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री डॅा. अपूर्व हिरे, रामहरी रुपनवर, श्रीमती नीलम गो-हे, श्रीमती विद्या चव्हाण यांची नियुक्ती जाहीर केली.

दिवंगत माजी सदस्य ॲड. शरद सोनू वाणी यांना विधानपरिषदेत आदरांजली दिवंगत माजी विधान परिषद सदस्य ॲड. शरद सोनू वाणी यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारेआदरांजली वाहण्यात आली.

विधानपरिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्तावावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget