नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा इतर कामकाज लक्षवेधी )

मराठा समाजाच्या आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक
मागास आयोगाला अहवाल 31 मार्च पर्यंत देण्याबाबत विनंती करणार - चंद्रकांत पाटील

नागपूर, दि. 21 : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबतच्या मागणीच्या संदर्भात शासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरु केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मागास आयोगाची स्थापना केली असून त्यांचा अहवाल 31 मार्च पर्यंत देण्याबाबत विनंती करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तसेच त्यांना शैक्षणिक सवलती देण्याबाबत आणि पूर्वीच्या शासनाच्या निर्णयानुसार मराठा आरक्षणाच्या अंतर्गत शासकीय नौकरीत लागलेल्या तरुणांच्या नौकऱ्यांचे संरक्षण
करण्याच्या अनुषंगाने विधानसभा सदस्य प्रकाश आंबिटकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना पाटील पुढे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्याबात शासन सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षणाची बाब न्यायलयाच्या कार्यकक्षेत आहे. न्यायालयात मराठा आरक्षणाची मागणीच्या अनुषंगाने मागास आयोगची शिफारस आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने मागास आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाला त्यांचे कामकाज करणे सोयीचे व्हावे. यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुवीधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. हा आयोग स्वायत्त असल्याने आयोगाला आपला अहवाल 31 मार्चपर्यंत द्यावा अशी विनंती करण्यात येईल. शासनाने या पूर्वीच मराठा समाजाच्या तरुण तरुणीला
विविध शैक्षणिक सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापूर्वी शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेवून जे तरुण तरुणींना शासकीय नौकरी मिळाली आहे. परंतु मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याने त्यांच्या नौकऱ्या जाऊ नये, त्यांच्या नौकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करत आहे. या तरुणांना खुल्या वर्गात समाविष्ट करुन घेण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून घेण्यात येतील, असेही पाटील यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यच्या ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचे नियोजन असून सुरुवातीला तातडीने 10 मोठ्या जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील इमारतींची दुरुस्ती व
नुतनीकरण करुन खासगी संस्थांना चालविण्याबाबत आवाहन करण्यात येईल. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अजित पवार, संजय कुटे, आशिश शेलार, जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget