नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा लक्षवेधी )

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी राज्यात 6 महिन्यामध्ये सहा ठिकाणी एसएनसीयू सुरु करणार

डोंगरी भागात डॉक्टरांच्या नेमणूकीसाठी वेगळे निकष करणार - आरोग्यमंत्र्यांची माहिती

नागपूर, दि. 14 :राज्यातील अर्भक मृत्यू रोखण्यासाठी राज्यात 6 महिन्यामध्ये सहा ठिकाणी एसएनसीयू सुरु करणार असून नाशिक आणि अमरावती येथे दोन एसएनसीयू तातडीने सुरु करणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

यासंदर्भात सदस्य अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या एसआरएस सर्व्हेनुसार राज्याचा अर्भक मृत्यू दर हा यावर्षी दोन अंकांनी कमी होऊन 19 एवढा आहे. राज्यामध्ये सध्या 36 एसएनसीयू कार्यान्वित असून त्यामधील मृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. हे प्रमाण 12 टक्क्यांवरुन ऑक्टोबर अखेर आठ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. 

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्यस्तरावर आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नामांकित खासगी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत निओनॅटोलॉजिस्ट
तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशींनुसार प्रतिजैविके, कॅफिन तसेच प्रसूतीपूर्व कॉरटिकोस्टेरॉईड याबाबत प्रोटोकॉल वापरण्यात येत आहे.

राज्यात असलेल्या एसएनसीयूमधील खाटांची संख्या वाढविण्यात आली असून 380 खाटा वाढविण्यात आल्या आहेत. राज्यात डॉक्टरांची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून डोंगरी भागांसाठी
डॉक्टरांच्या नेमणुकीकरीता वेगळे निकष लावण्यात येतील. राज्याच्या दुर्गम भागात 320 बंधपत्रीत उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, अबु आझमी, सत्यजित पाटील, श्रीमती सीमा हिरे यांनी भाग घेतला. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget