नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद लक्षवेधी )

वडाळा- ठाणे- कासारवडवली मेट्रोसाठी नव्याने निविदा मागवल्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 22 : मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गासाठी आधी आलेली निविदा अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा खूप अधिक आल्याने पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

मेट्रोच्या ठाणे जिल्ह्यातील कामांच्या अनुषंगाने सदस्य किरण पावसकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की, मेट्रो प्रकल्पासारख्या मोठ्या प्रकल्पात 3 ते 4 सल्लागार नेमले जातात. मुंबई मेट्रोच्या 4 मार्गासाठी व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सल्लागार म्हणून नेमले. त्यानुसार त्यांनी व्यवहार्यता अहवाल तयार करून दिले. त्यानंतर सर्वसाधारण सल्लागाराने निविदा सूचना व पुढील प्रक्रिया केली आहे. या मार्गासाठी मागविलेल्या निविदा सूचनेनुसार प्राप्त निविदा 25 टक्के अधिक रकमेची आल्याने पुन्हा निविदा मागविण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठी सर्वसाधारण सल्लागार नियुक्ती करण्याची प्रक्रिया जागतिक बँकेच्या निकषानुसार केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget