शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधान परिषदेत घोषणा

घोषित शाळांना २० टक्के अनुदान

कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी अधिवेशन संपण्यापूर्वी घोषित करणार

नागपूर, दि. १५ : १ व २ जुलै, २०१६ अन्वये मूल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. तसेच ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांची यादी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी ही पात्र यादी घोषित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी आज विधान परिषदेत घोषित केले. २० टक्के अनुदान प्रकरणी मंत्रीमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील अनुषंगिक कार्यवाही तात्काळ केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

१४ जून २०१६ पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अटी व शर्तींच्या अधीन राहून २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय ३० ऑगस्ट २०१६ च्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, तोच निर्णय १ व २ जुलै, २०१६ च्या पात्र शाळांसाठी लागू राहील, असेही तावडे यांनी सांगितले. 

विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुद्दा मांडला होता. त्यास उत्तर देताना तावडे यांनी ही माहिती दिली. शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार केला. त्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत अनेक बैठका घेण्यात आल्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. त्यानुसार या निर्णयांची घोषणा करण्यात आल्याचे तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

शिक्षणमंत्र्यांच्या या घोषनेनंतर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानले. तसेच आमदार विक्रम काळे यांनीही शिक्षक संघटंनाच्यावतीने शिक्षकांच्या या मागण्यांना न्याय दिल्याबद्दल तावडे यांचे अभिनंदन केले. 
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget