नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानसभा लक्षवेधी )

अवैध दारु विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर, दि. 19 : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामरक्षक दल नेमून अवैध दारु विक्रीविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य सत्यजीत पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातून दारुबंदीसाठी 250 ठराव प्राप्त झाले होते. त्याची तांत्रिक तपासणी झाल्यानंतर 130 अनुज्ञप्त्या बंद करण्यात आल्या. अवैध दारु विक्री रोखण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. अवैध दारु विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल तयार करण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत केले जाईल.

एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 1180 प्रकरणे उघडकीस आली असून 660 जणांना अटक केली आहे. 1 कोटी 58 लाख रुपयांचा माल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget