नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद लक्षवेधी )

सहायक आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल – राज्यमंत्री रणजित पाटील

नागपूर, दि. 15 : उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अलका पवार यांच्याकडे असलेला सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला पाटील उत्तर देत होते. अलका पवार या सन 2003 मधील महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेंतर्गत वरिष्ठ लिपिक या पदावर सेवेत नियुक्त झालेल्या आहेत. त्यांना उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावरून थेट सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आलेली नसून सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. हा पदभार काढून घेण्यात येईल, असे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, प्रसाद लाड यांनी भाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget