नागपूर हिवाळी अधिवेशन ( विधानपरिषद प्रश्नोत्तरे )

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रकरण आरक्षित भूखंडावर बेकायदेशीर काम दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार - डॉ.रणजित पाटील
नागूपर, दि. 20 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंडावर बेकायदेशीररित्या काम सुरु केल्या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर 15 दिवसात कारवाई करु, असे नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

आरक्षण असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे विकास कामे होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी विचारला होता. डॉ.पाटील पुढे म्हणाले, या गैरव्यवहार प्रश्नी आयुक्तांचा अहवाल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. आरक्षित भूखंडावर बांधकाम प्रस्तावित करुन कामाचे आदेश देण्यापूर्वी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे अभिप्राय घेतलेले नाही तसेच नियमानुसार अनुज्ञेय होणाऱ्या बांधकामात योग्य ते फेरबदल करून महानगरपालिका स्तरावर निर्णय घेण्यात येत आहेत.

००००

कंबाटा कंपनीतील कामगारांच्या देणी प्रश्नी बैठक - संभाजी पाटील-निलंगेकर

मे कंबाटा एव्हीएशन प्रायव्हेट लिमीटेड कंपनीतील कामगारांची देणी देण्याबाबत जानेवारी महिन्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लाऊ, असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य किरण पावसकर यांनी कंबाटा कंपनीतील तीन हजार कामगारांची देणे देण्याविषयी प्रश्न मांडला होता. संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले की, कामगारांच्या देणीबाबत केंद्र शासनाला कळविले असून लवकरात लवकर प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेतील सदस्य तसेच कंबाटा कंपनीचे अधिकारी यांची सभापती यांच्या दालनात बैठक घेण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, भाई जगताप यांनी भाग घेतला.

००००

नगरविकास विभागामार्फत जिओ कंपनीवर कारवाई - डॉ.रणजित पाटील

पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांना जिओ कंपनीकडून करारानुसार इंटरनेट सुविधा दिली जात नसल्याने नगरविकासामार्फत कारवाई करण्यात आल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अनिल भोसले यांनी जिओ कंपनीच्या इंटरनेट सेवेबद्दल प्रश्न विचारला होता. डॉ. पाटील पुढे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने रिलायन्स जिओ इंन्फोकॉम या कंपनीस इंटरनेटच्या उर्वरित जोडण्या पुणे महानगरपालिकेस तातडीने देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.

००००

धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांवर उपचार नाकारल्यास कारवाई - डॉ.रणजित पाटील

राज्यातील धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णावर उपचार नाकारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सदस्य संजय दत्त यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

डॉ. पाटील म्हणाले, धर्मदाय रुग्णालयांना गरीबांसाठी 20 टक्के बेड राखून ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहे. याबाबत अशा रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यात येते. दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दराने उपचार मिळण्याकरीता मंजूर केलेल्या योजनेत कसूर केल्यास अशा रुग्णालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
००००

गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ एका महिन्यात परळीला स्थापन करणार
- संभाजी पाटील-निलंगेकर
दिवंगत गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ एका महिन्यात परळी येथे स्थापन करण्यात येईल, असे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. महामंडळाबाबतचा प्रश्न विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांनी विचारला होता. पाटील यांनी अधिक माहिती देतांना सांगितले, राज्यात आठ लाख ऊस तोड कामगार आहेत. त्यांच्यासाठी ऊस तोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना, श्रमजीवी कामगार मंडळ स्थापन करण्यात आलेले आहेत. या महामंडळासाठी 100
कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे.
००००
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget